अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली. गौहर दुसऱ्यांदा गरोदर आहे. तिला जेहान नावाचा मुलगा आहे. गौहर व तिचा पती झैद लवकरच त्यांच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचे स्वागत करमार आहेत. गौहरने नुकताच तिचा यूट्यूब पॉडकास्ट ‘मानोरंजन’ लाँच केला आहे, यात ती मातृत्व, गर्भधारणा आणि इतर विषयांबद्दल बोलतेय. पहिल्या भागात, गौहरने तिच्या गर्भपाताबद्दल सांगितलं.

पॉडकास्टमध्ये गौहर भावुक झाली. तिच्या आयुष्यातील त्या कठीण टप्प्याबद्दल बोलताना तिला अश्रू अनावर झाले. गौहर नऊ आठवड्यांची गरोदर होती आणि तिचा गर्भपात झाला. “एक गोष्ट आहे जी मी आजपर्यंत कोणालाही सांगितली नाही. मी खूप हिंमत करून सांगत आहे. जेहानच्या आधी माझा गर्भपात झाला होता. त्या भावनेबद्दल मी आता काय सांगावं. ते शब्दात मांडणं शक्य नाही. मी जवळजवळ नऊ आठवड्यांचे माझे बाळ गमावले. ते सगळं खूप कठीण होतं,” असं गौहर म्हणाली.

गौहर खान दुसऱ्यांदा होणार आई

बिग बॉस ७ ची विजेती गौहर खान आणि झैद दरबार यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करून आनंदाची बातमी दिली. गौहर गरोदर आहे. लवकरच ती व झैद त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत. डिसेंबर २०२० मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याने पुन्हा आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली. लग्नानंतर चार वर्षांनी गौहर दुसऱ्यांदा आई होणार आहे. गौहर आणि जैदने त्यांच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला. यात दोघेही एकत्र नाचताना आणि मस्ती करताना दिसतात, शेवटी गौहर बेबी बंप फ्लाँट करते व दोघेही पोज देतात. “तुमच्या प्रार्थना व प्रेमाची गरज आहे. गाझा बेबी २”, असं कॅप्शन गौहरने व्हिडीओला दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौहर खान व झैद दरबार यांनी काही काळ डेट केल्यावर २५ डिसेंबर २०२० रोजी मुंबईत लग्न केलं होतं. करोना काळात या जोडप्याने त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एका खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. गौहर पती झैदपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर त्यांनी १० मे २०२३ रोजी त्यांचा मुलगा जेहानचे स्वागत केले. गौहर व झैद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.