बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कायमच चर्चेत असते. तिचा ‘व्हॉट द हेल नव्या’ हा पॉडकास्ट शो चर्चेचा विषय ठरतो. नव्या आपल्या या शोद्वारे आजी जया बच्चन यांना विविध प्रश्न विचारत असते. या प्रश्नांवर त्या अगदी चोख उत्तर देतात. जया बच्चन यांना नव्याने विचारलेले प्रश्न एखाद्या उत्तम विषयावर आधारित असतात. नव्याच्या नव्या पॉडकास्ट भागाचा विषय मासिक पाळी होता. यावेळी तिने जया बच्चन व आई श्वेता बच्चन यांना मासिक पाळीवर आधारित प्रश्न विचारले.

आणखी वाचा – “माझ्या तीन जीवनावश्यक…” जिममध्ये व्यायाम करताना निधन झालेल्या सिद्धांत वीर सूर्यवंशीची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल

मासिक पाळीदरम्यानचा तुझा अनुभव कसा होता? याबाबत श्वेताने आधी तिच्या आईला विचारलं. यावेळी श्वेता म्हणाली, “यादरम्यान तुम्हाला असं वाटतं की झोपून राहावं. चॉकलेट खावं. एकटंच राहावं.” पण जया बच्चन यांचा त्यांच्या मासिक पाळीदरम्यानचा अनुभव काही वेगळाच होता.

त्या म्हणाल्या, “एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला मासिक पाळी आली. चित्रीकरणासाठी जावं लागायचं आणि त्यावेळी व्हॅनिटी व्हॅनची सोय नव्हती. अशावेळी बस किंवा झाडामागे जाऊन पॅड बदलावा लागायचा. अशाप्रकरचे प्रसंग खूप विचित्र होते. यावेळी मासिका पाळीची लाज वाटायची.”

आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्या म्हणाल्या, “त्यावेळी सॅनिटरी पॅड कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकणं शक्य नव्हतं. अशावेळी प्लास्टिक बॅग आम्ही आमच्याबरोबर ठेवायचो. तेव्हा सॅनिटरी पॅड नव्हे तर सॅनिटरी टॉवेल असायचे. सॅनिटरी टॉवेल आम्ही वापरायचो. चित्रीकरणादरम्यान चार ते पाच सॅनिटरी टॉवेल एकाचवेळी वापरत असाल तर खाली बसण्याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही.” जया बच्चन यांचा हा अनुभव खरंच विचार करायला लावणारा आहे.