कंगना रणौत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. ती कधी वादग्रस्त विधाने तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करत असते. बऱ्याचदा कंगना देशातील महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य करते, याबरोबरच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची मतं बिनधास्त आणि परखडपणे मांडत असते. नुकतंच कंगनाने तिच्या एका पोस्टमध्ये सध्याच्या तरुण पिढीविषयी मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९७ ते २०१२ मध्ये जन्मेलेल्या पिढीतील मुलांना सध्या ‘जेन झी’ असं संबोधलं जातं. याच पिढीतील मुलांच्या जीवनशैलीबद्दल आणि एकूणच त्यांच्या आयुष्याकडे बघायच्या दृष्टीकोनाबद्दल कंगनाने तिचं परखड मत मांडलं आहे. तिच्या मते या पिढीतील मुलं ही प्रत्येक बाबतीत आळशी आहेत शिवाय तंत्रज्ञानाशी या मुलांचा थेट संबंध आल्याने त्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम झाल्याचं कंगनाने स्पष्ट केलं.

आणखी वाचा : “नेपोटीजम ही खूप क्षुल्लक गोष्ट…” मनोज बाजपेयींनी केला चित्रपटसृष्टीतील खऱ्या समस्येबद्दल खुलासा

कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “जेन झी…या लोकांचे हातपाय काड्यांप्रमाणे कमकुवत झाले आहेत. लोकांशी संभाषण, निरीक्षण तसेच वाचन यापेक्षा ही मुलं त्यांचा सर्वाधिक वेळ त्यांच्या स्मार्टफोनवर घालवतात. या मुलांना समोरच्या व्यक्तीला सन्मान देणं कधीच जमत नाही, या मुलांना फक्त लवकरात लवकर यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी त्यांना स्वतःला शिस्त लावायची नाहीये, त्यांना सगळं पटकन हवं आहे.”

kangana ranaut post

पुढे कंगना म्हणाली, “जेन झी मुलांना स्टारबक्स आणि अवोकाडो टोस्ट प्रचंड आवडतं पण आजच्या जमान्यात त्यांना स्वतःचं घर घेणं शक्य नाही. त्यांना ऊंची ब्रॅंडेड कपडे परिधान करायला आवडतात, पण नाती टिकवण्यासाठी एखाद्याशी प्रामाणिक राहणं त्यांना जमत नाही. काही रीपोर्टनुसार तर सेक्समध्ये सुद्धा ही मुलं प्रचंड आळशी आहेत. या मुलांच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवणं किंवा त्यांचा ब्रेन वॉश करणं हे अत्यंत सोप्पं आहे.” कंगना सध्या तमिळ हॉरर कॉमेडी ‘चंद्रमुखी २’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे, याबरोबरच कंगनाने दिग्दर्शित केलेला ‘इमर्जन्सि’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kangana ranaut speaks about gen z and their lifestyle in social media post avn
First published on: 04-03-2023 at 12:19 IST