बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीचे लाखो चाहते आहेत. नर्गिसने रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नर्गिसने बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नसतील तरी ती कायम चर्चेत असते. वेळोवेळी ती आपली मतं ठामपणे मांडत असते. न्युज १८ दिलेल्या मुलाखतीत कलाकारांचे खासगी आयुष्य आणि सोशल मीडिया यावर भाष्य केलं आहे.
नर्गिसने कलाकारांच्या खासगी आयुष्यावर बोलताना असं म्हणाली, “सामान्य माणसांप्रमाणे कलाकारांनादेखील काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात. मात्र या गोष्टी प्रत्येकवेळी लपून राहतील असे नाही. तसेच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते की आपले आवडते कलाकार कोणाला डेट करत आहेत. मी एक ईमानदार व्यक्ती आहे मला जर कोणी माझ्या खासगी आयुष्याबद्दल विचारले तर मी बिनधास्त सांगेन मात्र लोकांना आमच्या कामापेक्षा खासगी आयुष्यात जास्त रस असतो.”
मानसी नाईकचा जबरदस्त वर्कआउट; म्हणाली, “आता पश्चाताप…”
सोशल मीडिया, इंटरनेटव या विषयावर मात्र नर्गिस चांगलीच संतापली, म्हणाली “यामुळे कलाकारांच्या आयुष्यात कोणतीच गोपनीयता राहिली नाही. सोशल मीडियाला माहितेय आपल्याला काय बघायचे आहे आणि काय दाखवयाचे आहे.” तिच्या मते सोशल मीडियामुळे कलाकार पूर्णपणे आता उघडे झाले आहेत. ती पुढे म्हणाली, “मी कोणाशी डेटिंग करत आहे याची लोकांना काळजी का आहे या विचाराने मी कधीकधी अस्वस्थ होते. पण मी नेहमीच चांगल्या पद्धतीने हाताळले आहे.”
नर्गिस तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. नर्गिसने ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हीरो’, ‘अझहर’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर नर्गिसचा तोरबाज हा चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात नर्गिस संजय दत्तसोबत दिसली होती.