बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार झाली आहे. नुकतंच प्रियांका चोप्रा ही सहकुटुंब भारतात परतली आहे. प्रियांका ही तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा यांच्याबरोबर भारतात परतली आहे. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे. पण यावेळी प्रियांकाने मुलीला नीट न पकडल्याने ट्रोल झाली आहे.

प्रियांका चोप्रा ही काल दुपारच्या सुमारास भारतात परतली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा वनपीस परिधान केला होता. तर निक जोनसने हुडी, जिन्स आणि कॅप असा लूक केला आहे. तसेच प्रियांकाने लेकीला छानसा फ्रॉक घातला आहे. विशेष म्हणजे प्रियांकाची लेक मालतीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच प्रियांकाच्या चेहऱ्यावरही भारतात परतल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.
आणखी वाचा : Video : प्रियांका चोप्रा लेकीला घेऊन पहिल्यांदा भारतात, चाहते म्हणाले “परिणीतीच्या लग्नासाठी…”

पण प्रियांकाने मालतीला नीट न धरल्याने तिला ट्रोल करण्यात आलं आहे. या व्हिडीओत प्रियांका ही मालतीला एका हातात पकडताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. “कोणीतरी हिला लहान बाळाला कसं पकडायचं हे शिकवा”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केले आहे. तर एकाने “ही हिच्या बाळाला नीट पकडू शकत नाही, कशी आहे ही?” अशी कमेंट एकाने केली आहे. “हिला हिच्या मुलीलाही नीट पकडता येत नाही”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा ट्रोल

आणखी वाचा : Video : “मलई खाऊन दुसऱ्या ठिकाणी…” प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ वक्तव्यावर राखी सावंतचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रियांका चोप्राने नुकतंच ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ च्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. त्याबरोबर ती भारतात तिचा आगामी चित्रपट ‘सिटाडेल’चे प्रमोशन करण्यासाठी आल्याचे बोललं जात आहे. तसेच प्रियांकाची बहिण परिणिती चोप्रा ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ती या लग्नासाठी आल्याचं बोललं जात आहे. पण ती नेमकी कोणत्या कारणासाठी भारतात आली आहे, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.