दक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. पुष्पा चित्रपटामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडांचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा नेहमीच पाहायला मिळतात. अनेकदा ते दोघेही एकत्र डिनर डेट, व्हेकेशनवर जातानाचे फोटो व्हायरल होत असतात. मात्र नुकतंच रश्मिकाने तिच्या आणि विजय देवरकोंडाच्या नात्याबद्दल मौन सोडले आहे. सध्या रश्मिका ही गुडबाय या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान रश्मिकाला विजय देवरकोंडाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने स्पष्ट भाषेत उत्तर दिले.आणखी वाचा : “मला खात्री होत नाही तोपर्यंत…” विजय देवरकोंडाशी असलेल्या नात्याबद्दल रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा "मी विजयला गेल्या अनेक दिवसांपासून ओळखते. मी त्याच्या फार जवळ आहे. त्यामुळेच मला सिनेसृष्टीत कोणतीही अडचण आली, मला काहीही नवीन करावं वाटले, तर मी ते त्याला जाऊन विचारते. तो नेहमी माझ्यासाठी उभा असतो. आम्ही एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहोत. आम्ही एकमेकांबरोबर प्रत्येक गोष्टीबद्दल चर्चा करतो.मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याबरोबर एकत्र काही मोठे हिट चित्रपटही केले. त्यानंतर हल्लीच त्याने लायगर पॅन इंडिया चित्रपट केला. या चित्रपटामुळे त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. तर दुसरीकडे मी गुडबाय हा चित्रपटातून झळकत आहे." असे रश्मिका म्हणाली. आणखी वाचा : “राजकीय रंग…” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या निर्मितीदरम्यान शरद पवारांनी अमोल कोल्हेंना दिला होता खास सल्ला दरम्यान रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांचे हे दोन्ही चित्रपट बरेच गाजले होते. त्या दोघांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे अनेकदा बोललं जातं. मात्र अद्याप त्या दोघांनी यावर मौन सोडलेलं नाही.