बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आई झाल्याची गुडन्यूज दिल्यानंतर आता बिपाशा बासूही तिच्या बाळासाठी आतुर आहे. बिपाशाने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बिपाशा आणि करण ग्रोव्हरच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक अभिनेत्रींनी आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. प्रियांका चोप्राची मुलगी मालती आणि सोनम कपूरने वायूला जन्म दिल्या

नंतर आलियाने रविवारी ६ नोव्हेंबरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली. आलियानंतर बिपाशाही बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहे. बिपाशा आणि करण ग्रोव्हरने एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. करण ग्रोव्हरही बिपाशाला व्हिडीओमध्ये डान्ससाठी कंपनी देताना दिसत आहे. “मला जेमतेम हालचाल करता येत आहे”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा >> लंडनमध्ये असलेली करीना कपूर आलिया भट्टच्या मुलीला भेटण्यासाठी उत्सुक, म्हणाली “तिला पाहण्यासाठी…”

हेही वाचा >> “अपूर्वा नेमळेकर घरात फक्त अभिनय…”, ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या योगेश जाधवचा खुलासा

बिपाशाच्या या व्हिडीओवर ‘बेबी ऑन द वे’ असं लिहलेलंही दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट करत बाळासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे. बिपाशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही नुकताच पार पडला. सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.

आणखी वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिपाशाने काही दिवसांपूर्वीच मॅटर्निटी फोटोशूटही केलं होतं. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे बिपाशाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. आता आलियाप्रमाणेच बिपाशाही लवकरच गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे.