scorecardresearch

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाच्या धामधुमीत अजय देवगणचे मित्रासाठी खास ट्वीट, म्हणाला “अण्णा…”

अभिनेता अजय देवगणने अथिया आणि के.एल राहुलसाठी एक विशेष ट्वीट केलं आहे.

अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाच्या धामधुमीत अजय देवगणचे मित्रासाठी खास ट्वीट, म्हणाला “अण्णा…”
अथिया शेट्टी-केएल राहुलसाठी अजय देवगणचं खास ट्वीट

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात आता अभिनेता अजय देवगणने अथिया आणि के.एल राहुलसाठी एक विशेष ट्वीट केलं आहे.

अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या नवीन आयुष्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार शुभेच्छा देताना दिसत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतंच अभिनेता अजय देवगणने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने अथिया आणि के.एल राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत. “माझा प्रिय मित्र सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांना त्यांची मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. अथिया आणि केएल राहुलचेही अभिनंदन. या तरुण जोडप्याला आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा आणि अण्णा तुम्हालाही या शुभप्रसंगासाठी खूप खूप शुभेच्छा. लव्ह अजय”, असे अजय देवगणने म्हटले.

दरम्यान अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाच्या निमित्ताने सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर संगीत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत नाईटचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात बंगल्याला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई पाहायला मिळत आहे. तसेच ‘आज की पार्टी मेरी तरफ से’ गाण्याचा आवाजही येताना पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 10:42 IST

संबंधित बातम्या