‘आदिपुरुष’च्या टीझरवरुन सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. कुणी प्रभास आणि सैफ अली खानच्या लूकवर टीका करतंय, तर कुणी रामायणाचा अपमान केलाय असं म्हणतंय. आता तर हळूहळू चित्रपटावर बंदी घालायची मागणी होऊ लागली आहे. यामध्ये सर्वात जास्त टीका होत आहे ती या चित्रपटात वापरलेल गेलेल्या व्हीएफएक्सबद्दल. चित्रपटातील व्हीएफएक्स हे चांगलेच गंडले असल्याचं प्रेक्षकांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर व्हीएफएक्स असणारा हा काही पहिला बॉलिवूडचा चित्रपट नाही. शाहरुखच्या रा.वनपासून नुकत्याच आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’पर्यंत कित्येक चित्रपटात या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केलेला आपल्याला दिसून येतो. पण भारतात सर्वप्रथम कोणत्या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर केला गेला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चटकन अनिल कपूरचा ‘मिस्टर इंडिया’ ही नाव समोर येतं. पण ‘मिस्टर इंडिया’मध्ये स्पेशल इफेक्ट वापरले होते व्हीएफएक्स नव्हे त्यामुळे त्याला पहिला व्हीएफएक्स असणारा बॉलिवूड चित्रपट म्हणता एटणार नाही. खरंतर अजय देवगणने सर्वप्रथम बॉलिवूडला व्हीएफएक्सशी ओळख करून दिली होती.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर, फक्त ८० रुपयाला मिळणार चित्रपटाचे तिकीट

अजय देवगण आणि काजोल अभिनीत ‘प्यार तो होना ही था’ या बॉलिवूडच्या चित्रपटात सर्वप्रथम व्हीएफएक्सचा वापर केला गेला. या चित्रपटाच्या मुख्य गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता. बऱ्याच लोकांचा यावर विश्वास बसत नसला तरी ही गोष्ट अगदी खरी आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार एका मुलाखतीदरम्यान अजय देवगणने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अजय म्हणाला, “बॉलिवूडमध्ये व्हीएफएक्सचा पहिला प्रयोग मी स्वतः केला होता. ‘प्यार तो होना ही था’मधील एका गाण्यात मी स्वतः या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यासाठी मला लिमका बुक ऑफ रेकॉर्डकडून पुरस्कारही मिळाला आहे. जेव्हा ही तंत्रज्ञान आणि त्यासंबंधीत सामुग्री माझ्याकडे आली तेव्हा त्याचा वापर कसा करायचा हे कोणालाच माहीत नव्हतं. मी स्वतः त्या गाण्याचं चित्रीकरण करून कॉम्प्युटर ग्राफीक जोडून, ग्रीन स्क्रीनचा वापर करून ते गाणं तयार केलं होतं.”

शाहरुखच्या रेड चिलीज कंपनी पाठोपाठ अजय देवगणची एनवाय व्हीएफएक्सवाला ही कंपनीही सध्या आघाडीवर आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्याच्या व्हीएफएक्सचं कामही अजयच्या याच कंपनी केलं आहे अशी मध्ये चर्चा सुरू झाली होती. अजयच्या कंपनीने याविषयी माहिती देणारी एक पोस्ट सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केली आणि आदिपुरुषच्या व्हीएफएक्सशी आपला संबंध नसल्याचं या कंपनीने स्पष्ट केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn is the first person to introduce vfx technology to bollywood through his film avn
First published on: 09-10-2022 at 15:23 IST