अभिनेता अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सुपरस्टार कलाकारांमध्ये केली जाते. सध्या तो त्याच्या आगामी ‘OMG 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून नवा वाद सुरू झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. या वादांच्या पार्श्वभूमीवर या अक्षय कुमारबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’वर बंदी? चित्रपटातील संवाद व दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. अक्षय कुमारने आतापर्यंत सेल्फी, रामसेतू, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे यांसारखे चित्रपट दिले मात्र,. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच खराब कामगिरी केली आहे. प्रेक्षकांना हे चित्रपट फारसा आवडला नाही. अक्षय कुमार शेवटचा सेल्फीमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याच्याबरोबर इमरान हाश्मीही होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली होती.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, अक्षय आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ५० ते १०० कोटी रुपये मानधन घेतो. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षयने त्याच्या आगामी ‘OMG 2’ साठी त्याच्या मानधनात घट केली आहे. या चित्रपटासाठी त्याने ३५ कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा- “मला शाहरुखला कधीच भेटायचं नाही, कारण…”; हुबेहुब SRK सारखा दिसणाऱ्या तरुणाचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह, अभिनेते पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन अमित राय यांनी केल आहे.