बॉलिवूडमधील लोकप्रिय कपूर कुटुंबियांच्या घरी काही दिवसांपूर्वीच लाडक्या परीचं आगमन झालं. आलिया भट्ट व रणबीर कपूरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर कपूर कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आलिया-रणबीर त्यांच्या लेकीचं नाव काय ठेवणार याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता आहे.
आलिया-रणबीरच्या लाडक्या लेकीच्या नावाबाबत कपूर कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू आहे. तर आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवायचं याबाबत विचार केला असल्याची माहिती आहे. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीच्या नावातून दिवंगत अभिनेते व रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांना आदरांजली देण्याचा विचार केला आहे. आलिया-रणबीरच्या मुलीचं नावाचं ऋषी कपूर यांच्याशी खास कनेक्शन असल्याची माहिती आहे.
हेही वाचा >> Video : लतिका शूटिंगसाठी ट्रक चालवायला गेली अन्…; ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील व्हिडीओ व्हायरल
मीडिया रिपोर्टनुसार, आलिया-रणबीरने आपल्या मुलीसाठी केलेल्या नावाचा विचार ऐकताच नीतू कपूरही भावूक झाल्या. कपूर कुटुंबियात मुलीचं आगमन झाल्यामुळे नीतू कपूरही खूश आहेत. आपल्या नातीबद्दल भावना व्यक्त करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता.
हेही पाहा >> Photos: फूड ब्लॉगर ते प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा खूनी, कोण आहे आफताब पूनावाला?
आलिया-रणबीरने १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. ६ नोव्हेंबर रोजी त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. लवकरच आपल्या लाडक्या लेकीचं नाव ते जाहीर करणार आहेत.