बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या आलिया ही तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामुळे ती उत्सुक आहे. तर दुसरीकडे आलियाचे आजोबा म्हणजे सोनी राजदानचे वडील नरेंद्र राजदान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचा रुग्णालयात जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, “सोनी राजदान यांचे वडील नरेंद्र राजदान गेल्या काही दिवसांपासून आजरी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याच्या कारणामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात आहेत.
आणखी वाचा :“कार दरीत कोसळल्यानंतर वैभवी उपाध्याय जीव वाचवण्यासाठी करत होती धडपड, पण…”; पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम

नरेंद्र राजदान यांची प्रकृती ही सतत खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येणार होते. मात्र सध्या त्यांना रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. ते ९५ वर्षांचे आहेत.

भट्ट कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “नरेंद्र राजदान यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुफ्फुसात संसर्गामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये हलवावे लागेल, असे सांगितले होते. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खोलीत ठेवण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : “भिडे गुरुजींसारखी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्म…” शरद पोंक्षेंच्या पोस्टने वेधलं लक्ष

नरेंद्र राजदान यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सध्या भट्ट कुटुंबातील प्रत्येक सदस्य चिंतेत आहे. आलिया भट्टने आजोबांच्या प्रकृतीमुळे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आजोबांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच आलिया विमानतळावरुन थेट ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाली. यामुळे तिने विदेश दौराही रद्द केला आहे.