बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यांना फोटोग्राफर्सवर चिडताना अनेकदा पाहिलं गेलं आहे. अलिकडेच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात त्या अचानक फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत होत्या. पण याउलट अमिताभ बच्चन मात्र नेहमीच शांत असलेले दिसतात. त्यांना असं चिडलेलं फारच क्वचित कुणी पाहिलं असेल. चित्रपटांमध्ये त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ असं नाव मिळालं असलं तरी खऱ्या आयुष्यात ते सर्वांना नेहमीच शांत असलेले दिसले आहेत. पण काही वेळा असं घडलं आहे की अमिताभ बच्चन यांनी रागावरचं संतुलन गमावलं होतं. एकदा या रागामुळे त्यांची पत्नी जया बच्चन यांना अपमानितही व्हावं लागलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्या रागाचा उल्लेख प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी त्यांच्या Devil’s Advocate: The Untold Story या पुस्तकात केला आहे. पण नेमकं त्यावेळी काय झालं होतं? असं काय घडलं होतं की अमिताभ बच्चन यांनी सगळा राग पत्नी जया बच्चन यांच्यावर काढला? आज अमिताभ बच्चन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातला तो रंजक किस्सा…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा- रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या चाहतीने अमिताभ बच्चन यांच्यासाठी सोडलं होतं अन्न पाणी; नंतर बिग बींनी…

करण थापर यांच्या पुस्तकात ज्या मुलाखतीचा उल्लेख आहे ती मुलाखत १९९२ साली अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर घेण्यात आली होती. सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. पण जेव्हा या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या भूतकाळाविषयी विशेषतः त्यांच्या आयुष्यात आलेल्या महिला आणि अफेअर्स याबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मात्र वातावरण बिघडलं. मुलाखत संपेपर्यंत अमिताभ यांनी त्यांच्या रागावर संयम ठेवला. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या अफेअरबाबत, “अनेक महिलांशी तुमचं नाव जोडलं गेलं होतं तर तुमचं लग्नानंतर कोणाशी अफेअर होतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अमिताभ बच्चन यांनी ‘कधीच नाही’ असं उत्तर दिलं होतं.

जेव्हा या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना, ‘अभिनेत्री परवीन बॉबी यांच्याशी तुमचं नाव जोडलं जातं. त्याच्याशी अफेअर असल्याच्याही चर्चा झाल्या आहेत.’ होतं. तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले, “नाही, मीसुद्धा असे अनेक आर्टिकल वाचले आहे. पण ते सत्य नाही. पण मी मासिकांना अशाप्रकारचे आर्टिकल लिहिण्यापासून थांबवू शकत नाही.” यानंतर त्यांना अभिनेत्री रेखा यांच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. रेखा यांच्याशी अफेअर होतं का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी याला स्पष्ट नकार दिला. रेखा यांच्याशी कधीच अफेअर नव्हतं असं ते म्हणाले.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, “मला आजपर्यंत असा पुरुष…”

इथंपर्यंत सर्वकाही ठीक चाललं होतं. पण जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बाजूला बसलेल्या जया बच्चन यांना पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अमिताभ यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं होतं. त्या म्हणाल्या, “मी नेहमीच माझ्या पतीवर पूर्ण विश्वास ठेवते.” यावेळी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यात विचित्र प्रकारची शांतता होती. कशीबशी मुलाखत संपली पण यावेळी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत विचारलेल्या प्रश्नांमुळे अमिताभ बच्चन खूपच नाराज झाले होते.

आणखी वाचा- “रोमँटिक सीन पाहताना जया..” रेखा यांनी सांगितला होता ‘मुकद्दर का सिंकदर’च्या स्क्रीनिंग दरम्यानचा ‘तो’ किस्सा

मुलाखतीदरम्यान, अफेअर आणि रेखा यांच्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ खूप संतापले होते. पण कसा तरी तो राग त्यांनी कंट्रोल केला होता. पण जेव्हा जया बच्चन जेवणाच्या टेबलावर सर्वांसाठी जेवण वाढत होत्या, तेव्हा त्यांनी अमिताभ यांना, ‘तुम्ही भात घेणार का?’ असं विचारलं आणि यावरूनच अमिताभ यांना पत्नी जया यांच्यावर सगळा राग काढला. अमिताभ रागाने म्हणाले की, “तुला माहिती आहे मी कधी भात खात नाही. मी कधी खाल्लेच नाही ते आता का देत आहेस?” त्यावर जया म्हणाल्या, “चपाती यायला वेळ लागणार आहे म्हणून मी भात घेणार का असं विचारलं.” पण अमिताभचा पारा चढला होता. ते म्हणाले, ‘बस्स खूप झालं, मी म्हणालो ना भात नको. मी चपाती व्हायची वाट पाहीन. तुला समजत नाही का? तुला काय समस्या आहे? मी काय म्हणतोय ते तुला का ऐकू येत नाही?” असं त्यांनी सर्व पाहुण्यांसमोर जया यांना सुनावलं होतं.

त्यावेळी वातावरण गरम झालेलं पाहून समजत होतं की हा मुद्दा कुठून आणि कोणत्या गोष्टीमुळे सुरू झाला होता. याविषयी करण थापर यांनी त्यांच्या पुस्तकात पुढे लिहिलंय, जया बच्चन चपात्या तयारी झाल्या की नाही ते पाहण्याच्या बहाण्याने आत गेल्या आणि नंतर बाहेर आल्याच नाहीत.

Story img Loader