महानायक अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये मोजल्याची माहिती समोर येत आहे. अयोध्येत जमीन खरेदी केल्यानंतर त्यांनी आता मुंबईपासून थोड्याच अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये जमीन घेतली आहे, अशा बातम्या येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये १० कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येत त्यांनी जमीन घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) कडून १० हजार चौरस फूट जमीन खरेदी केल्याची माहिती आहे. ए अलिबाग नावाच्या प्रकल्पात ही जमीन खरेदी करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. अमिताभ यांनी अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही.

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

एका सूत्राच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात या जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. बिग आता अलिबागमध्ये मालमत्ता असलेल्या बॉलीवूडकरांच्या यादीत सामील झाले आहेत. शाहरुख खान, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांची अलिबागमध्ये मालमत्ता आहे.

‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन

दरम्यान, या वर्षी जानेवारीमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत १४.५ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. १० हजार चौरस फुटाचा भूखंड त्यांनी घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी समुद्रकिनारी वसलेल्या अलिबागमध्ये जमीन घेतली आहे.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते लवकरच ‘कल्कि 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहेत. यातील त्यांचा ‘अश्वत्थामा’चा पहिला लूक नुकताच समोर आला आहे. या चित्रपटातील लूक पोस्टर व एक टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत महानायक अमिताभ बच्चन यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan buys land in alibaug worth 10 crore hrc
Show comments