scorecardresearch

सेटवर सगळ्यांसमोर अमरीश पुरींनी गोविंदाच्या लगावली होती कानशिलात; ‘ती’ एक चूक ठरली होती कारणीभूत

त्या घटनेनंतर दोघांनी एकमेकांबरोबर कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला

amrish-puri--slapped-govinda
सेटवर सगळ्यांसमोर अमरीश पुरींनी गोविंदाच्या लगावली होती कानशिलात (संग्रहित छायाचित्र)

चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कलाकारांमध्ये अशा अनेक घटना घडतात, ज्यांची चर्चा चित्रपटाच्या कॉरिडॉरमध्ये बराच काळ सुरू असते. अशीच एक घटना गोविंदा आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्याशी संबंधित आहे. हे दोन्ही स्टार्स प्रेक्षकांचे फेव्हरेट असायचे. मात्र, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात असे काही घडले, ज्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याची शपथ घेतली. काय होते ते संपूर्ण प्रकरण, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा- आणखी एका स्टारकीडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; ‘या’ तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आमिर खानचा मुलगा

अमरीश पुरी हे अत्यंत वक्तशीर होते

अमरीश पुरी हे केवळ त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नव्हे तर वक्तशीर राहण्यासाठी देखील लक्षात ठेवले जातात. असे म्हणतात की अमरीश पुरी वेळेचे इतके वक्तशीर होते की त्यांना शूटिंगसाठी जो काही वेळ दिला जात असे, तो एकतर त्यावेळी तिथे असायचा किंवा अनेक वेळा ते वेळेच्या आधीच तिथे पोहोचायचे. असं म्हणतात की एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात अमरीश पुरी सकाळी नऊ वाजता सेटवर पोहोचले होते. या चित्रपटात गोविंदाही मुख्य भूमिकेत होता. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही गोविंदा सेटवर पोहोचला नाही, त्यामुळे अमरीश पुरींचा पारा चढला आणि त्यांनी गोविंदाला कानशिलात लगावली.

हेही वाचा- पाकिस्तानी लेहेंग्यावरुन ट्रोल झाल्यानंतर स्वराने शेअर केला नवा फोटो; म्हणाली “मी राणी…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार सकाळी ९ वाजताचे शुटींग होते. मात्र गोविंदा संध्याकाळी ६ वाजता म्हणजेच नऊ तास उशिराने शूटिंगला पोहोचला. यामुळे संतापलेल्या अमरीश पुरी यांनी गोविंदासोबत वाद घातला. प्रकरण इतके पुढे गेले की अमरीश पुरी यांनी गोविंदाला जोरदार थप्पडही मारली. या घटनेने दुखावल्यानंतर गोविंदाने अमरीश पुरीसोबत पुन्हा कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर, गोविंदा देखील त्याच्या काळातील एक प्रसिद्ध स्टार होता आणि एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे तो अनेकदा शूटिंगसाठी उशिरा पोहोचत असे. याच कारणामुळे गोविंदा त्यादिवशी उशिरा पोहोचला आणि त्याबदल्यात अमरीश पुरीसोबत त्याचे भांडण झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमरीश पुरी यांनी रागाच्या भरात गोविंदाला गलिच्छ नाल्याचा किडा म्हटले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या