Animal या सिनेमाचा एकदम जबरदस्त ट्रेलर आज लाँच झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, सुरेश ओबेरॉय, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा होते आहे. अशात रणबीर कपूरने सिनेमा कसा आहे याविषयी केलेलं वक्तव्यही चर्चेत आहे. ‘अॅनिमल’ हा सिनेमा अॅडल्ट रेटेड ‘कभी खुशी कभी गम’ आहे असं तो म्हणाला आहे. रणबीरच्या या विधानाची चांगलीच चर्चा होते आहे.

काय म्हटलं आहे रणबीर कपूरने?

“मला वाटतं माझा सिनेमा हा अॅडल्ट रेटेड कभी खुशी कभी गम आहे. आम्ही १०० दिवस या सिनेमाचं शुटिंग करत होतो. मी गोष्ट एका वाक्यात सांगायची झाली तर आपल्या कुटुंबाचं रक्षण करणाऱ्या मुलाची ही कहाणी आहे. सिनेमातलं माझं पात्र डार्क आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं सिनेमातलं पात्र खूप गुंतागुंतीचं आहे, असं मला वाटतं. या सिनेमाच्या प्रत्येक पात्रात वेगवेगळे रंग आहेत. त्यामुळे हा सिनेमा वेगळा झालाय. जेव्हा सिनेमाचं शुटिंग सुरु केलं तेव्हा मी बाबा झाला होतो. कारण तेव्हाच माझ्या आयुष्यात माझी मुलगी राहा आली. आम्ही इथे शुटींग करायचो आणि मग राहाशी जाऊन खेळायचो, धमाल करायचो.” असं रणबीर कपूरने म्हटलं आहे.

आपल्या वडिलांनाच आपला आदर्श मानणारा, त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा एका गुन्हेगार मुलांचं त्याच्या वडिलांशी असलेलं नातं हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं असणार अशी शक्यता ट्रेलरवरुन वर्तवली जात आहे. याबरोबरच या कुटुंबाचा गुन्हेगारी विश्वाशी काहीतरी कनेक्शन असल्याचंही ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. चित्रपटात या नात्याबरोबरच जबरदस्त अॅक्शन आणि प्रचंड हाणामारी आणि हिंसा पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्येच दिसली आहे. चित्रपटात रश्मिका मंदानाचं पात्रदेखील फार महत्त्वाचं ठरणार असल्याचं दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अब एक और खरोच आयी तो दुनिया जला दुंगा” असं आपल्या वडिलांसमोर सांगणाऱ्या रणबीरचं हे हिंस्र रूप व डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. चित्रपटातील बॉबी देओलचे पात्र हेदेखील रणबीरप्रमाणेच हिंसक दाखवले असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.