अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी १२ फेब्रुवारीला मुंबईत झाली. या पार्टीला बॉलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टही या पार्टीत दिसली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. याशिवाय या पार्टीमध्ये प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेरही सहभागी झाले होते आणि त्यांनी सिद्धार्थ- कियारा सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. पण त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री आलिया भट्टसाठीही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

अनुपम खेर यांनी नवविवाहित जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्याबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “माझ्या आवडीच्या दोन सुंदर व्यक्ती एकत्र आल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा. देव त्यांना जगातलं सर्व सुख आणि आनंद देवो. मी कियाराला तिच्या करिअरच्या सुरुवातीपासून पाहिलं आहे. तिने या क्षेत्रात बरंच यश मिळवलं आहे. टच वूड. प्रेम आणि आशीर्वाद.”

आणखी वाचा- रेखाशी सिक्रेट मॅरेज, २ अफेअर, ४ लग्नं अन्…, चर्चेत राहिलेलं विनोद मेहरांचं खासगी आयुष्य

याशिवाय अनुपम खेर यांनी अभिनेत्री आलिया भट्टसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीतील भेटीचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “प्रिय आलिया, बऱ्याच काळानंतर सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये तुला भेटून खूप छान वाटलं. तुझ्याबरोबर त्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा तू शाळेत होती आणि मी नेहमीच तुला एक जन्मजात अभिनेत्री म्हणून चिडवायचो. तुझी बरीच काम मला आवडली खासकरून ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये तुझा अभिनय उत्तम होता. खूप सारं प्रेम.”

आणखी वाचा- सिद्धार्थ- कियारा रिसेप्शनमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे आलिया होतेय ट्रोल, नेटकरी म्हणाले, “स्वतःच्या लग्नात…”

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर ते मागच्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. याशिवाय त्यांनी ‘कार्तिकेय २’मध्येही काम केलं होतं. अलिकडेच त्यांचा ‘शिव शास्त्री बाल्बोआ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा चालला नाही.