आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ४ गडी राखून पराभव केला. या पराभवासह आरसीबीचा इंडियन प्रीमियर लीग २०२४ मधील प्रवास संपला. अर्थात या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला पण संघाचा मोठा खेळाडू विराट कोहलीने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात पूर्णपणे वर्चस्व गाजवले. विशेषतः त्याने ध्रुव जुरेलला ज्या पद्धतीने बाद केले ते पाहून सगळेच अवाक झाले. विराटने सीमारेषेजवळून रॉकेटसारखा थ्रो फेकला.

रियान परागने डावाच्या १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनविरुद्ध चांगला शॉट खेळला. रियान परागने हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. चेंडू वेगाने गेला, पण विराट कोहलीही त्याच वेगाने धावला. त्यानंतर कोहलीने गोलंदाजीच्या टोकावर थ्रो केला. यादरम्यान परागने दोन धावा चोरण्याचा प्रयत्न केला, त्याने पहिली धाव वेगाने धावली, परंतु दुसऱ्या धावेवर दोन्ही फलंदाज संथ झाले. इकडे कॅमेरून ग्रीनकडे चेंडू येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता विकेट्स विखुरल्या. ध्रुव जुरेल क्रीझवर पोहोचण्याआधीच तो बाद झाला होता.

Confusion at the Argentina Morocco football match in the Olympics sport new
चाहत्यांची घुसखोरी, सामना स्थगित अन् निर्णायक गोल रद्द! ऑलिम्पिकमधील अर्जेंटिना-मोरोक्को फुटबॉल सामन्यात गोंधळ
, Shamar Joseph six video
ENG vs WI 2nd Test : शमर जोसेफच्या षटकराने प्रेक्षक गॅलरीचे तुटले छत, चाहते थोडक्यात बचावले, VIDEO व्हायरल
Kavem Hodge reveals about Mark Wood funny conversation
ENG vs WI 2nd Test : ‘भावा, घरी बायका मुलं आहेत जरा बेताने…’, वेगवान मार्क वूडला केव्हिन हॉजचं सांगणं, पाहा VIDEO
India vs Zimbabwe 2nd T20I Updates Cricket Score in Marathi
IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा
Rohit Sharma kisses Hardik Pandya Video viral
IND vs SA Final : रोहित-हार्दिकने जिंकली चाहत्यांची मनं, रडायला लागलेल्या पंड्याचे हिटमॅनने घेतले चुंबन, पाहा VIDEO
Rohit Sharma takes a bite of Barbados pitch after T20 World Cup win
IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?
Suryakumar Yadav's Incredible Catch Seals T20 World Cup for India
IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’ने सामन्याला दिली कलाटणी, ज्यामुळे भारताने ११ वर्षानंतर ICC ट्रॉफीवर कोरलं नाव, पाहा VIDEO
Watch: Rahul Dravid consoles heartbroken Virat Kohli after another cheap dismissal
IND vs ENG Semifinal : राहुल द्रविडने निराश विराटला दिला धीर, सांत्वन करतानाचा VIDEO व्हायरल

विराटचा थ्रो येताना पाहून ध्रुव जुरेलने डायव्हिंग करून क्रीजच्या आत जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो काही इंच दूर राहिला. ध्रुव जुरेलचा हा धावबाद सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकला असता, पण दुर्दैवाने आरसीबीला विजय मिळवता आला नाही.

तिसऱ्या पंचांनी हा विकेट २-३ वेळा तपासून पाहिला. तिसऱ्या पंचाने ते तपासले तेव्हा जुरेलची बॅट क्रीजपासून थोडी दूर असल्याचे दिसून आले. जेव्हा ग्रीनने बेल्स विखुरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा हात स्टंपला लागला. बेल्स विखुरण्यापूर्वी जुरेल क्रीझवर पोहोचला नव्हता. तर बेल्स उडवल्यानंतर ग्रीनच्या हातून चेडू निसटला होता, त्यामुळे ग्रीनने जेव्हा त्याला बाद केले तेव्हा चेंडू त्याच्या हातात होता का हे पंचांनी तपासले आणि मग निर्णय दिला.

राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने ६ गडी गमावून ६ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. त्यामुळे आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत कोलकाता संघाविरूद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.