अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने २०२१ मध्ये मुलगी वामिकाला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहलीने पापाराझींना आपल्या मुलीचे फोटो काढू नका, अशी विनंती केली होती. अनुष्का नेहमीच वामिकाला पापाराझींपासून दूर ठेवताना दिसते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या सामन्यानंतर अनुष्का शर्मा पती विराटसह मुंबईत दाखल झाली. या वेळी अनेक पापाराझींनी अनुष्काला फोटोसाठी विनंती करीत थांबवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पापाराझींनी थांबवल्यावर अनुष्काने एक-दोन फोटो काढले परंतु त्यानंतर अत्यंत संयमाने तिने “बच्चा साथ में है, बाद में…” असे बोलत फोटो काढण्यास नकार दिला आणि ती कारमध्ये बसल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा : “मला चित्रपट मिळत नव्हते…” बॉलीवूडमधील संघर्षाबाबत क्रिती सेनॉनचे मोठे वक्तव्य

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत एका सामन्यादरम्यान वामिकाचे अनेक फोटो काढण्यात आले होते. या घटनेनंतर इन्स्टाग्रामवर मेसेज लिहीत अनुष्काने आपला राग व्यक्त करीत आमच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा, असे आवाहन सर्वांना केले होते. दरम्यान, अनुष्काचा सध्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे कौतुक आहेत. यात एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, “मला तिचा हा स्वभाव खूप आवडतो; नाही म्हणजे नाही.” तसेच काहींनी “बॉलीवूडमध्ये अनुष्का अशी एकमेव आहे, जी नेहमी आपल्या मुलीबरोबर असते आणि तिची काळजी घेते,” अशा कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : ७२२४ किमी दूर… स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाला सिद्धार्थ चांदेकर; मितालीने शेअर केला व्हिडीओ… म्हणाली, “या सगळ्या गोष्टी पाहून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वामिकाच्या जन्मानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडपासून काही काळ दूर होती परंतु आता लवकरच ती, ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.