‘टायगर ३’मधून कमबॅक करत सलमान खानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता भाईजानच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. मीडिया रीपोर्टनुसार सलमान या ईदला कदाचित मोठ्या पडद्यावर झळकणार नाही. मात्र आगामी काळात तो साजिद नाडियाडवाला यांच्याबरोबर एक बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट सुरू करणार अशी चर्चा आहे. खुद्द अरबाज खाननेही याची पुष्टी केली आहे की तो ब्लॉकबस्टर फ्रँचायझी ‘दबंग’ चा चौथा भाग तयार म्हणजेच ‘दबंग ४’ लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानने ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटलीची भेट घेतली असून तो त्याच्याबरोबरच ‘दबंग ४’ सुरू करणार असल्याची चर्चा रंगली होती. आता नुकतंच ‘मिड डे’शी संवाद साधताना अरबाजने या गोष्टीचा खुलासा केला आहे. अरबाजने अद्याप अॅटलीची भेट घेतली नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. अरबाज म्हणाला, “जोवर याबद्दल अधिकृत व्यक्तीकडून वक्तव्य येत नाही तोवर लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवणं योग्य नाही.”

Ulta-Chashma
उलटा चष्मा: नवी ‘भूमिका’
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

आणखी वाचा : रणवीर सिंगच्या ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारण्याबद्दल मुकेश खन्ना राग व्यक्त करत म्हणाले, “तू कृपा करून…”

याबरोबरच या मुलाखतीमध्ये अरबाज खानने ‘दबंग ४’चीदेखील पुष्टी केली. अरबाजच्या म्हणण्याप्रमाणे सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेची भूमिका करण्यास फार उत्सुक आहे. शिवाय योग्य वेळ येताच याबद्दल घोषणा करणार असल्याचंही अरबाज खानने स्पष्ट केलं. सध्या सलमान आणि अरबाज दोघेही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने अद्याप तरी याची अधिकृत घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

पहिला ‘दबंग’ २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप याने दिग्दर्शित केला होता. ४१ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४१०.२२ कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर आलेल्या ‘दबंग २’चं दिग्दर्शन अरबाज खानने केलं होतं अन् या चित्रपटाद्वारे अरबाजने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. तर ‘दबंग ३’चं दिग्दर्शन प्रभू देवाने केलं होतं. आता यातील पुढील भागाचं दिग्दर्शन पुन्हा अरबाजच करणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.