आपल्या सुमधूर आवाजाने आणि अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह होय. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. फक्त सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटीही त्याच्या आवाजाचे चाहेत आहेत, बऱ्याचदा ते त्याच्या कॉन्सर्टला हजेरी लावतात. नुकतीच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने अरिजीत सिंगच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बॉलीवूडचा आघाडीचा गायक अरिजीत सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात अरिजीत लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची माफी मागताना दिसत आहे. माहिरा नुकतीच अरिजीतच्या कॉन्सर्टला गेली होती. यावेळी स्टेजवर परफॉर्म करत असताना त्याची नजर माहिरावर पडली. मात्र तो तिला लगेच ओळखू शकला नाही.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

माहिरा तिथे बसलीये हे लक्षात येताच अरिजीतने कॅमेरामनला माहिरावर फोकस करण्यास सांगितलं. मग तो म्हणाला, “मी रईस चित्रपटातील ‘जालिमा’ हे गाणं गायलं आहे आणि हे तिचं गाणं आहे. तेच गाणं मी आता गाणार आहे. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला माफ करा. मॅडम, खूप खूप धन्यवाद!”

महेश मांजरेकरांच्या चित्रपटाची चांगली सुरुवात, ‘जुनं फर्निचर’ने तीन दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरिजीत सिंह व माहिरा खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून चाहते अरिजीतच्या विनम्रतेचं कौतुक करत आहेत.