दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. उत्तम गायिका असलेली जनाई आता सुंदर दिसते. जनाई लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ती एका ऐतिहासिक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. आशा भोसलेंसमोर दिग्दर्शकाने जनाईला सिनेमात घेत असल्याची घोषणा केली आहे.
जनाई आजी आशा भोसले यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. जनाई तिची गायकी आणि सौंदर्यामुळेही खूप चर्चेत असते. आता तिच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे.
आशा भोसले यांची नात जनाई भोसले ‘द प्राईड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रदर्शित होईल. दिग्दर्शक संदीप सिंह जनाईला लाँच करणार आहेत. या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे.
जनाई ही आशा भोसले यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.