बॉलीवूडमध्ये रेणुका शहाणे व आशुतोष राणा यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. ‘सर्कस’, ‘सुरभि’, ‘हम आपके है कौन’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या रेणुका शहाणेंनी २००१ मध्ये आशुतोष राणांबरोबर लग्न केलं. या दोघांची लव्हस्टोरी कोणत्याही परिकथेपेक्षा वेगळी नाही. नुकत्याच ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष राणांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं.

आशुतोष व रेणुका यांची पहिली भेट हंसल मेहता यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. गायिका राजेश्वरी सचदेव यांनी या दोघांची ओळख करुन दिली होती. आशुतोष यांना रेणुका पाहताक्षणी आवडल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्याने दिग्दर्शक रवी राय यांच्याकडे अभिनेत्रीचा फोन नंबर मागितला. परंतु, फोन नंबर देण्यापूर्वी दिग्दर्शकाने आशुतोष यांना रात्री ९ नंतर रेणुकाला संपर्क करू नकोस असं बजावलं होतं. तसंच तिला संपर्क करण्यापूर्वी आधी आन्सरिंग मशीनवर मेसेज टाक असंही रवी राय यांनी अभिनेत्याला सांगितलं होतं. पुढे, आशुतोष राणा यांनी रेणुकाला दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. तेव्हापासून दोघांमध्ये वरचेवर बोलणं सुरू झालं.

Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
Prajakta mali put her mothers name said its mandatory to put mother's name after your name decision by Aditi Tatkare
‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Seeing that state of Vijay Chawan, Dharmendra himself stood up, Varad Chawan told the story
“व्हिलचेअरवर ऑक्सिजनचा पाइप लावून विजय चव्हाणांना बसलेलं पाहून धर्मेंद्र यांनी…”, वरद चव्हाणने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला…
shweta shinde recall college days memories and connection with kareena kapoor and vivek oberoi
मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”

हेही वाचा : “खऱ्या आयुष्यातील अर्जुन कोण आहे?” जुई गडकरीने लग्नाबद्दल मांडलं मत; नेटकऱ्याला म्हणाली, “कळेल हा…”

आशुतोष राणा या मुलाखतीत सांगतात, “मला रात्री ९ नंतर रेणुकाला संपर्क करायचा नाही असं आधीच सांगण्यात आलं होतं. तरीही एके दिवशी मी तिला रात्री १० वाजता फोन केला. सुदैवाने तिने फोन उचलला. तेव्हा मी तिला घरी फोन न करता मोबाइलवर फोन केला होता. त्यादिवशी आम्ही जवळपास दीड तास एकमेकांशी बोललो. दुसऱ्या दिवशी रात्री मी तिला पुन्हा फोन केला. त्या दिवशी परत आमच्यात बोलणं झालं. आम्ही कधीच एकमेकांना भेटलो नव्हतो. फक्त फोनवर आमच्यात मैत्री झाली. कालांतराने दिवसांतून तीन वेळा आम्ही बोलू लागलो. आणखी गोष्ट अशी की, तिला तेव्हा कविता अजिबात आवडत नव्हत्या आणि मला कविता लिहायला खूप आवडायचं.”

हेही वाचा : “कॅन्सर होण्याची शक्यता…”, ऐश्वर्या नारकरांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहतीने दिला सल्ला; अभिनेत्री म्हणाल्या, “यापुढे…”

लव्हस्टोरीबद्दल सांगताना आशुतोष राणा पुढे म्हणाले, “प्रपोज करण्यापूर्वी मी खूप साशंक होतो कारण, मला माझी मैत्रीण गमवायची नव्हती. पहिल्यांदा मी एक कविता लिहिली आणि तिला ऐकवली. त्यावर ती म्हणाली, ‘राणाजी ऐका, मला वाटतं मी तुमच्या प्रेमात पडलेय.’ त्यावर मी म्हटलं, ‘ठीक आहे, तुम्ही या… आपण बसून बोलू’. त्यानंतर तीन वर्षे डेट गेल्यावर आम्ही या नात्याबद्दल घरी सांगितलं. वडिलांच्या आग्रहामुळेच मी रेणुकाला प्रपोज केलं होतं. आम्हाला लग्न करायचं नव्हतं. आम्हाला चांगले मित्र म्हणून एकत्र राहायचं होतं. कारण, लग्नानंतर मी बदलेन, वेगळा वागेन असं मला वाटत होतं. पण सुदैवाने असं काही झालं नाही.”

हेही वाचा : तारीख ठरली! प्रथमेश परब ‘या’ दिवशी करणार साखरपुडा; म्हणाला, “आमच्या रिलेशनशिपमध्ये…”

“माझ्या वडिलांनी मला रेणुकाबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं, “आमच्या विभिन्न स्वभावांमुळे आमचं लग्न दोन दिवसही टिकणार नाही अशी मला खात्री आहे!” पण त्यानंतर वडिलांनी माझी खूप समजूत काढली. मी रेणुकाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर आमचं लग्न झालं. आमच्या लग्नाला जवळपास दीड लाख लोक आले होते. कारण, आमचं माझ्या गावी होती…संपूर्ण गाव लग्नाला आलं होतं तो एक खूप मोठा सोहळा होता.” असं आशुतोष राणा यांनी सांगितलं.