scorecardresearch

“नवीन लग्न होऊनही…”, अथियाला राहुलबरोबर पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अथिया शेट्टी आणि केएल राहुल काही दिवसांपूर्वीच अडकलेत लग्नाच्या बेडीत

Kl rahul, athiya shetty, kl rahul athiya shetty, athiya shetty trolled, अथिया शेट्टी, केएल राहुल, अथिया शेट्टी ट्रोल
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. २३ जानेवारीला या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर अथिया आणि राहुल पहिल्यांदाच एकत्र मीडियासमोर आले. पण यावेळी लूकमुळे अथिया शेट्टी पुन्हा ट्रोल होताना दिसत आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल काल संध्याकाळी मुंबईतील वांद्रे येथे एकमेकांबरोबर दिसले. दोघेही डिनर डेटसाठी येथे पोहोचले होते. यावेळी अथिया प्रिंटेड ब्लू शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसली, तर राहुल व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसला. अथिया या लूकमध्ये खूपच स्टायलिश आणि कूल दिसत होती, पण नेटकऱ्यांना मात्र तिचा हा लूक अजिबात आवडलेला नाही आणि अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा- ना कपाळी टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र; नवी नवरी अथिया शेट्टीचं ‘ते’ वागणं पाहून भडकले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून युजर्सनी अथियाच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका युजरने लिहिलं, “ती थोडी नवीन लग्न झालेल्या मुलीसारखी आली असती तर बरं झालं असतं”, दुसऱ्याने लिहिलं, “बॉलिवूड अभिनेत्री आणि सामान्य मुलगी यात हाच फरक आहे… सामान्य मुलगी सिंदूर, मंगळसूत्र कधीच विसरत नाही आणि अभिनेत्री लग्न करतात पण दुसऱ्या दिवसापासून ना सिंदूर ना मंगळसूत्र..मग लग्नात मंगळसूत्र आणि सिंदूरची काय गरज?” तर आणखी एकानं लिहिलं, “नवीन लग्न झालेलं असूनही तसं वाटत मात्र अजिबातच नाही.”

आणखी वाचा- अथिया शेट्टी-केएल राहुलला लग्नात खरंच कार, फ्लॅटसारख्या महागड्या भेटवस्तू मिळाल्या का? सुनील शेट्टी खुलासा करत म्हणाला…

दरम्यान, अथिया आणि केएल राहुल यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी अद्याप दिलेली नाही. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी आयपीएलनंतर रिसेप्शन होणार असल्याची माहिती दिली होती. या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू सहभागी होताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 15:25 IST