अभिनेत्री भूमी पेडणेकरने ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. भूमीने अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध शैलीतील चित्रपट करून तिने आपल्या चाहत्यांची मने जिंकली आणि यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. भूमीने अलिकडेच ‘बधाई दो’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. ‘बधाई दो’ हा चित्रपट भारतातील LGBTQ+ समुदायासमोरील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा होता, यासाठी भूमीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’मध्ये व्हिलनची भूमिका का निवडली? अभिनेत्री म्हणाली, “मी स्वत: हा निर्णय…

‘बधाई दो’साठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यावर भूमीने LGBTQ+ समुदायाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता ही अभिनेत्री समलिंगी विवाहाच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. समलिंगी विवाहाचे समर्थन करताना भूमी म्हणाली की, “चित्रपटासाठी कोणताही पुरस्कार जिंकणे हा खरतर माझा वैयक्तिक विजय आहे, परंतु ‘बधाई दो’ या चित्रपटामुळे मला जे काही प्रेम मिळाले त्याचा विचार करुन मला म्हणावे लागेल, हा संपूर्ण LGBTQ+ समुदायाचा विजय आहे. चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून मला जाणीव झाली की, आपला देश बदलत आहे. माझी बरीच मित्रमंडळी या समुदायाचा एक भाग आहेत आणि या चित्रपटामुळे मी त्यांचे प्रतिनिधीत्व करू शकले.”

हेही वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेतील मजेशीर व्हिडीओ शेअर करीत स्मृती इराणी म्हणाल्या, “लग्न झाल्यावर हे काम…”

समलिंगी विवाहाच्या सुनावणीबाबत विचारले असता ‘ई टाइम्स’शी संवाद साधताना भूमी म्हणाली, “मला असे वाटते ‘प्रेम म्हणजे प्रेम आहे’ एक व्यक्ती म्हणून प्रत्येक बाबतीत समानता असली पाहिजे. देवाने आपल्या सर्वांना एकाच धाग्याने बनवले असून कोणा एका व्यक्तीच्या आयुष्याबाबत निर्णय घेणे आपल्या हातात नाही. LGBTQ+ समुदायाचे मी कायम समर्थन करेन आणि माझा त्यांना नेहमी पाठिंबा राहिल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भूमीच्या अलिकडेच रिलीज झालेल्या ‘अपवाह’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. आगामी ‘द लेडी किलर’ चित्रपटात भूमी अर्जून कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.