बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर हे दोघेही आई-बाबा झाले आहेत. लग्नानंतर ६ वर्षांनी बिपाशा बासूने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. नुकतंच बिपाशाने तिच्या सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या लेकीचे नावही जाहीर केले आहे.

बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी काही तासांपूर्वी नव्या पाहुणीचे आगमन झालं आहे. बिपाशा बासूने सकाळी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना मुलगी झाल्याची माहिती दिली आहे. यात तिने बाळाचा एक फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा बासू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

बिपाशाने काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाळांच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. याला तिने आशीर्वाद असे कॅप्शन दिले आहे. याबरोबर तिने १२-११-२२ असेही या फोटोवर लिहिले आहे. त्यात ती म्हणाली तुमच्या प्रेमाचे आणि देवीच्या आशीर्वादाचे प्रत्यक्ष रुप इथे आहे. ते फारच सुंदर आहे. त्याबरोबर तिने तिच्या लेकीचे नावही सांगितले आहे.

बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या लेकीचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर असे ठेवले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘अलोन’ सिनेमाच्या वेळी बिपाशा आणि करणची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशासोबतच हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. बिपाशाला एक वर्ष डेट केल्यानंतर करण आणि बिपाशाने लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशाने एका मुलीला जन्म दिला आहे.