Rajkumar Rao And Patralekha Blessed With Baby Girl : गेल्या काही दिवसांत बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी आई-बाबा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे. विकी कौशल-कतरिना कैफ, परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी सोशल मीडियाद्वारे आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. अशातच बॉलीवूडच्या आणखी एका लोकप्रिय जोडप्यानं लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी आई-बाबा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे.
अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा या लोकप्रिय जोडप्याने आई-बाबा झाल्याची खुशखबर सर्वांबरोबर शेअर केली आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत त्यांनी ही गुडन्यूज सर्वांना सांगितली आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा या जोडप्याला कन्यारत्न झालं आहे. मुलगी झाल्याचा हा आनंद त्यांनी एका खास पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे.
खास बाब म्हणजे, लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना मुलगी झाली आहे. यामुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास पोस्टमधून त्यांनी मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. “आमच्या आयुष्यातील एक बातमी सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, देवाने आमच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी पाठवली आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच देवाने आम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद दिला आहे.”
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलीवूड कलाकारांनीसुद्धा दोघांवर आई-बाबा होणार झाल्यानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि दोघांचं कौतुक केलं आहे. जुलै महिन्यात दोघांनी आई-बाबा होणार असल्याची खुशखबर शेअर केली होती आणि आता दोघे आई-बाबा झाले आहेत.
राजकुमार राव आणि पत्रलेखानं शेअर केली पोस्ट
राजकुमार आणि पत्रलेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऑक्टोबर २०२१ मध्ये राजकुमारने पत्रलेखाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी चंदीगडमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्याआधी राजकुमारने पत्रलेखाला पहिल्यांदा एका जाहिरातीत पाहिलं होतं आणि त्याचक्षणी ही आपली जीवनसाथी असल्याचं त्याने ठरवलं होतं. २०१४ मध्ये आलेल्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एकत्र काम केलं आहे. दोघांचे अनेक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
