शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. शाहिद आणि मीराने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात. अनेकदा शाहिद मीरच्या आयुष्यात येण्याने झालेल्या सकारात्मक बदलावर भाष्य करताना दिसतो. परंतु अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने लग्नाबाबत केलेल्या विधानावर नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत. अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. हेही वाचा- कोणत्या अभिनेत्याला शर्टलेस बघायला आवडेल? अमृता रावने दिलेलं मजेशीर उत्तर, म्हणाली… रेडिटने शाहिद कपूरच्या फिल्म कम्पॅनियनच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला. मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना शाहिद कपूरने सांगितले की, "लग्न फक्त एका गोष्टीसाठी केले जाते ते म्हणजे पुरुषांचे आयुष्य विखुरले आहे आणि स्त्री ते नीट करण्यासाठी आली आहे. जेणेकरून त्याचे उर्वरित आयुष्य स्थिर आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून गुजरेल आणि आयुष्य हेच आहे." लग्नाबाबत शाहिद कपूरचे हे विचार नेटकऱ्यांना पटले नाहीत. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली कमेंट करत शाहिद कपूरला ट्रोल केलं आहे. एकाने लिहिलं, " तुम्ही कबीर सिंगची भूमिका केली आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही खऱ्या आयुष्यातही त्याच्यासारखे वागलात." आणखी एका युजरने लिहले की, "त्याने कबीर सिंगची भूमिका केली कारण तो तसा होता." तसेच "स्त्रिया पुरुषांना सुधारण्यासाठी असतात का?" असा प्रश्न एका युजरने केला आहे. एका यूजरने म्हटले की, "पुरुषांना सुधारणे हे महिलांचे काम नाही. लग्न ही पती-पत्नी दोघांचीही समान जबाबदारी आहे."