scorecardresearch

शाहरुख खानने दिली मक्केतील मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास

या व्हिडिओमध्ये शाहरुखने पांढरी पारंपरिक वस्त्रं परिधान केली आहेत

शाहरुख खानने दिली मक्केतील मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
शाहरुख खान मक्का भेट

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवशी त्याने बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आणला. गेली ३ वर्षं शाहरुख हा रुपेरी पडद्यापासून दूर आहे आणि आता तो ‘पठाण’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. नुकतंच त्याने मक्केतील मशिदीला भेट दिली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अर्थात शाहरुखच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याची पुष्टी झालेली नसली तरी त्याने मक्का येथे भेट देऊन उमराह(प्रार्थना) केलं असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख पांढरी वस्त्रं परिधान करून आहे आणि हा परिसर मक्का मशिदीचा असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आणखी वाचा : “घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत

किंग खान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सौदीमध्ये गेले काही दिवस होता. या चित्रपटाचं सौदीमधील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत या शहराचे आभार मानले होते. या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये शाहरुखच्या सौदीमधील चाहत्यांनी त्याने मक्का येथे जाऊन ‘उमराह’ करावा अशी विनंती केली होती.

सौदीमधील आपल्या चाहत्यांच्या विनंतीचा मान राखत चित्रपटाच्या यशासाठी मक्का येथे हजेरी लावत त्यांने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर लोक शेअर करत आहेत. शिवाय सगळ्यांनी शाहरुखला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या ‘पठाण’बरोबरच ‘डंकी’ या चित्रपटाचीही चर्चा होत आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर तापसी पन्नूदेखील दिसणार आहे. ‘डंकी’ पुढच्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 21:52 IST

संबंधित बातम्या