बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचे निधन झाले आहे. अभिनेत्री व आलियाची आई सोनी राजदान यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नरेंद्र राजदान यांना काही दिवसांपूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्याच्या कारणामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चितांजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. अखेर, गुरुवारी(१ जून) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.




आलिया भट्टने आजोबांच्या प्रकृतीमुळे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आजोबांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच आलिया विमानतळावरुन थेट ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाली होती. यामुळे तिने विदेश दौराही रद्द केला होता.