बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू नुकतीच आई झाली. १२ नोव्हेंबरला बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली होती.

बिपाशा व करणच्या लेकीची झलकही व्हिडीओत दिसली होती. आता बिपाशाने लेकीला स्तनपान करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या मुलीची झलकही पाहायला मिळत आहे. ‘माझ्या हृदयाबरोबर माझी सकाळ’ असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा>>“तुनिषाची आत्महत्या, भीतीचं वातावरण अन्…”, पाच दिवसांनी मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव

bipasha basu

बिपाशा व करणने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव ‘देवी’ असं ठेवलं आहे. देवीबरोबरचे फोटो, व्हिडीओ करण व बिपाशा अनेकदा शेअर करत असतात. ३० एप्रिल २०१६ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर सहा वर्षांनंतर ते आता आईबाबा झाले आहेत.

हेही वाचा>> “एक सुंदर मुलगी मला भेटायला आली आणि…”, प्रसाद ओकने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिपाशा आणि करणची ‘अलोन’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशाबरोबरचा हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत.