गेल्या काही दिवसात अनेक कलाकार त्यांच्या आजारपणामुळे चर्चेत आले आहेत. अनेक कलाकारांनी आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींमध्ये त्यांना असलेल्या आजाराबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. मध्यंतरी समांथा रूथ प्रभू तिच्या आजारामुळे चर्चेत आली होती. त्या पाठोपाठ आता आणखी एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने तिला असलेल्या आजाराचे नाव सांगत त्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख. ‘दंगल’, ‘लुडो’ ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सारख्या चित्रपटात अभिनय करून लोकप्रियता मिळवलेल्या फातिमाने पहिल्यांदाच तिच्या आजारपणाचा खुलासा केला आहे. फातिमाने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत तिला झालेल्या गंभीर आजाराबद्दल माहिती दिली आहे. फातिमाला ‘अपस्मार’ (एपिलेप्सी) हा आजार आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या ट्रेनिंगदरम्यान या आजाराचं निदान झाल्याचं तिने सांगितलं. ‘एपिलेप्सी जागरूकता महिना’च्या निमित्ताने तिने तिच्या या आजाराबद्दल माहिती दिली.

हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रुल’ला भिडणार शाहरुखचा ‘हा’ बहुप्रतीक्षित चित्रपट, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

फातिमाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिला असलेल्या या आजाराबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांना सांगत ‘अपस्मार’ (एपिलेप्सी) या आजाराबद्दल तिला प्रश्न विचारण्यास सांगितले. फातिमाला हा आजार असल्याचे कळताच अनेकांनी काळजी व्यक्त केली. तसंच तिला अनेक जणांनी या आजाराबद्दल प्रश्नही विचारले. फातिमाने त्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देत या आजाराबद्दल असलेले गैरसमज दूर केले.

एका चाहत्याने तिला विचारलं, “तू या आजाराशी कसे जुळवून घेतेस?” त्यावर उत्तर देताना फातिमाने लिहिलं, “माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. माझे मित्रमैत्रिणी आणि बिजली यांची मला साथ मिळत आहे. त्यामुळे मला हिंमत मिळते. काही दिवस खूप वाईट असतात तर काही चांगले असतात.”

दुसऱ्या नेटकऱ्याने तिला विचारलं, “तुला या आजारचं निदान कधी झालं?” त्यावर तिने लिहिलं, “मला ‘दंगल’ चित्रपटाच्या ट्रेनिंगदरम्यान अचानक आकडी आली आणि मी बेशुद्ध झाले. मी शुद्धीवर आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की असा एक आजार असतो. पहिली पाच वर्ष मला हे पचवणं खूप अवघड गेलं. पण आता मी त्याचा स्वीकार केला आहे.

आणखी वाचा : “प्रवास अजूनही सुरुच आहे…”, ‘सॅम बहादुर’च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल भावूक

तिच्या एका चाहत्याने तिला विचारलं, “शूटिंगच्या वेळी तुला यांचा त्रास होऊ लागला तर तू काय करतेस?” त्यावर तिने उत्तर दिलं, “मी ज्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर काम करते त्यांना माझ्या आजाराबद्दक आधीच कल्पना देऊन ठेवते आणि आणि तेही मला समजून घेतात. या आजारावर घ्यावी लागणारी काळजी मी सेटवरही घेत असते.” या आजारामुळे तिला पोहणं, गाडी चालवणं, एकटं राहणं यांसारखं काहीही करता येत नाही, असाही खुलासा तिने केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress fatima sana shaikh opens up about living with epilepsy rnv
First published on: 14-11-2022 at 16:13 IST