बॉलीवूड चित्रपट, हिंदी मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री गौहर खान हिने गुड न्यूज दिली आहे. गौहर दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने पतीबरोबरचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा. या व्हिडीओत ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय.

गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत. डिसेंबर २०२० मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याने पुन्हा आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. लग्नानंतर चार वर्षांनी गौहर दुसऱ्यांदा आई होणार आहे. गौहर आणि जैदने त्यांच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. यात दोघेही एकत्र नाचताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. शेवटी गौहर बेबी बंप फ्लाँट करते व दोघेही पोज देतात.

४१ वर्षांच्या गौहरने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. “तुमच्या प्रार्थना व प्रेमाची गरज आहे. गाझा बेबी २”, असं कॅप्शन गौहरने व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ –

गौहर खान आणि झैद दरबार यांनी दुसऱ्या बाळाबद्दल आनंदाची बातमी शेअर करताच कमेंट्स सेक्शनमध्ये चाहते व सेलिब्रिटींच्या मेसेजेसचा पूर आला आहे. अनेकांनी गौहर व झैदचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या बाळासाठी आशीर्वाद दिले आहेत, तसेच काहींनी हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

गौहर खान व झैद दरबार यांनी काही काळ डेट केल्यावर २५ डिसेंबर २०२० रोजी मुंबईत लग्न केलं होतं. करोना काळात या जोडप्याने त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एका खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. गौहर पती झैदपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर त्यांनी १० मे २०२३ रोजी त्यांचा मुलगा जेहानचे स्वागत केले. गौहर व झैद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.