बॉलिवूडमधील अजय देवगण काजोल हे बॉलिवूडमधील आदर्श जोडपं मानलं जात. दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केल्याने साहजिकच त्यांवेळी याची चर्चा झाली. आज या दाम्पत्याला एका मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. यांची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. आता ती बॉलिवूड पदार्पण करणार अशी चर्चा सुरु आहे त्यावर काजोलने भाष्य केले आहे.

आज अनेक बॉलिवूड कलाकारांचे मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. न्यासाच्या बॉलिवूडपदार्पणावर काजोल म्हणाली, नाही, “तिचा सध्या अभिनय करण्याचा कोणताही विचार नाही. ती सध्या अभ्यास करत आहे आणि मजा करत आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. न्यासा सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे.

“सिद्धिविनायक मंदिराबद्दलची ‘ती’ प्रथा…” दिग्दर्शक मधुर भांडारकरांनी केला मुलाखतीत खुलासा

काजोल कायमच एक जागरूक आई म्हणून राहिली आहे. न्यासाला मध्यंतरी तिच्या लूकवर ट्रोल करण्यात आले होते. त्यावर काजोल म्हणाली होती की ट्रोलिंग आता सोशल मीडियाचा एक भाग बनला आहे. न्यासा ट्रोल केल्यामुळे तिला वाईटदेखील वाटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोलचा आगामी चित्रपट ‘सलाम वेंकी’ ९ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. आमिर या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. याशिवाय राजीव खंडेलवाल, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेवतीने केलं आहे.