बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर कंगना बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसते. अनकेदा कंगनाच्या वक्तव्यांमुळे वादही होताना दिसतात. यामुळेच तिच्या ट्वीटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच कंगना ट्वीटरवर परतली आहे.

कंगनाने तिच्या चाहत्यांसाठी नुकतंच ट्वीटरवर #AskKangana सेशन घेतलं होतं. चाहत्यांच्या प्रश्नांना कंगनाने या सेशनमधून उत्तरं दिली. एका ट्वीटर अकाऊंटवर कंगनाला काँग्रेस नेते राहुल गांधींबाबत प्रश्न विचारण्यात आला. “काँग्रेस व राहुल गांधीबाबत कोणीतरी बोलत असताना तू ऐकल्यावर त्याबाबत तुझ्या मनात काय विचार येतात?” असं विचारण्यात आलं. कंगनाने चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधीना छोट्या मुलाची उपमा दिली आहे. “ओले ओले…शो शो स्वीट” असं कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. कंगनाचं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

Pm Narendra Modi in srinagar
जम्मू आणि काश्मीरमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; म्हणाले, “लवकरच…”
Narendra Modi and Rahul gandhi (3)
“भाजपा सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना…”, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना थेट प्रश्न
Behind the victory of Congress Sacrifice dedication and coordination
काँग्रेसच्या विजयामागे त्याग, समर्पण आणि समन्वय…
Rahul gandhi
Lok Sabha Result Update : आता सत्ता स्थापन करणार की विरोधात बसणार? राहुल गांधी प्रश्नावर म्हणाले, “आम्ही…”
reasons given by Congress leaders for ignoring pm narendra modis statement about Gandhi
गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे
prithviraj chavan
“मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना आता…”; गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका!
rahul gandhi
“एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला!
PM Narendra Modi Rahul Gandhi
गांधी कुटुंबियांबरोबर संबंध कसे आहेत? पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राहुल गांधींना फोन…’

हेही वाचा>> Video: “जान, वापस आ जाओ” राखी सावंतने पती आदिलसाठी कॅमेऱ्यासमोरच फोडला टाहो, म्हणाली “लग्नानंतर पहिल्या रमझानमध्ये…”

कंगना देशातील व राज्यातील राजकारणाबाबतही परखडपणे बोलताना दिसते. एका चाहत्याने कंगनाला तिच्या राजकीय पदार्पणाबाबत प्रश्न विचारला. “राजकारणात कधी पदार्पण करणार?” या प्रश्नावर उत्तर देत कंगनाने “मला कलाकार म्हणून अजून काम करायचं आहे” असं ट्वीट केलं आहे.

हेही वाचा>> सलमान खानने दिलं ब्रेसलेट, गर्लफ्रेंडने गिफ्ट केली बाईक अन्…; ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन मालामाल

कंगना ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती भारताच्या पहिला महिला मुख्यमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनाने नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असून चित्रपटातील तिचा पहिला लूकही समोर आला आहे.