Ayodhya Ram Mandir Inauguration: संपूर्ण देशासाठी उद्याचा दिवस (२२ जानेवारी) खूप मोठा दिवस असणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या ऐतिहासिक दिवसांसाठी देशातील लोक खूप उत्साहित आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे बरेच सेलिब्रिटी अयोध्येला रवाना होताना दिसत आहेत. बॉलीवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रणौत रामनगरीत पोहोचली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री कंगना रणौत शनिवारी अयोध्येत पोहोचली. आज अभिनेत्री संस्कृत विज्ञान पद्म विभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज यांना भेटली. या भेटीचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना रामभद्राचार्य यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. अशातच कंगनाचा दुसऱ्याबाजूला एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – “काही वर्ष…”, लग्नानंतर अभिनेत्री पूजा सावंत ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार का? म्हणाली…
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री समाजसेवा करताना दिसत आहे. कंगना साडीतच एका हनुमात मंदिरात झाडू मारताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं आहे, “हनुमान मंदिरात सफाई केली. पण गर्दी जास्त झाली.” कंगनाचा या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – यंदा कर्तव्य आहे! अभिनेत्री पूजा सावंतने सांगितलं कधी आणि कुठे होणार लग्न?
दरम्यान, कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचा ‘इमरजेंसी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनयाबरोबर कंगनाने दिग्दर्शनाची भूमिकाही सांभाळली आहे. २४ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.