आपल्या सडेतोड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. ‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणून ती सतत चर्चेत असते. कंगना रणौत आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील वाद सर्वश्रृत आहेत. नुकतंच करण जोहरने कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान केले होते. त्यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

करण जोहरने नुकतंच ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याने सिनेसृष्टीसह खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. या कार्यक्रमात करण जोहरला “तुला राजकीय घटनेवर आधारित कोणता चित्रपट पाहायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने “१९७५ दरम्यान देशभरात लागू केलेल्या आणीबाणीची अन् तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यावर आधारित ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे”, असे म्हटले. यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : “आता मी तुझं लग्न लावतोय…”, सिद्धार्थ चांदेकरची आई पुन्हा विवाहबंधनात, फोटो आला समोर

“हा… हा… गेल्यावेळी त्याने ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चित्रपट प्रदर्शनाच्या आठवड्यात माझ्याविरोधात बदनामी केली होती. मला बदनाम करण्यासाठी आणि माझ्या चित्रपटाचे नुकसान करण्यासाठी त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनाही पैसे दिले गेले.

त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी ठरलेला विकेंड हा माझ्यासाठी वाईट स्वप्नात बदलला आणि आता पुन्हा एकदा मला भीती वाटू लागली आहे. कारण त्याने माझा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे”, असे कंगना रणौतने म्हटले आहे.

आणखी वाचा : Emergency Teaser : “इंडिया इज इंदिरा…” कंगना रणौतच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी’चा टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना रणौत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील कंगनाच्या लूकचीही जबरदस्त चर्चा आहे. याबरोबरच अनुपम खेर, महिमा चौधरी, सतीश कौशिक, मिलिंद सोमणसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कंगना स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होत आहे.