सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, एका मुलाखतीत कियाराने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सिद्धार्थने काय भेटवस्तू दिली याबाबतचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ व कियाराने नुकतेच दुबईतील एका हॉटेलच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कियाराला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने काय गिफ्ट दिले, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देत कियारा म्हणाली, केवळ एक दिवस नाही तर हा संपूर्ण महिना आमच्यासाठी खास आहे. लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून सिद्धार्थने एक सरप्राईज ट्रिपचे आयोजन केले होते." सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदा 'शेरशाह' चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटापासून दोघांमध्ये जवळीक वाढली होती. अनेकदा दोघांना एकत्र बघण्यात आले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. हेही वाचा- कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मुलीला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेलं दत्तक, आता गाजवतेय हॉलीवूड सिद्धार्थ आणि कियाराच्या कामाबाबत बोलायचे झाले, तर गेल्यावर्षी कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूप कमी कमाई केली होती. आता लवकरच ती साऊथचा सुपरस्टार राम चरणबरोबर ‘गेम चेंजर’ चित्रपटात झळकणार आहे हेही वाचा- मिथुन चक्रवर्तींना मिळाला डिस्चार्ज, म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मला ओरडले कारण…” तर सिद्धार्थ ‘योद्धा’ चित्रपटात झळकणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट १५ मार्च २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सिद्धार्थने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पुलिस फोर्स’ चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितीन धीर, ऋतुराज सिंह, मुकेश ऋषी व ललित परिमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.