Malaika Arora Arhaan Khan New Restaurant : मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचं ६ वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. दोघांचंही ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअपनंतर आता मलायकाने एक नवीन सुरुवात केली आहे. तिने मुलगा अरहानबरोबर मुंबईत स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. हे सुंदर रेस्टॉरंट वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे. हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवलेले आहे. हे रेस्टॉरंट खूपच सुंदर आहे. शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक लक्ष वेधून घेतो.

हेही वाचा – माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

मलायका अरोराची पोस्ट

बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात. रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका अरोराचे चाहतेही तिच्या या नव्या सुरुवातीमुळे खूप खूश आहेत. तिच्या पोस्टवर कमेंट्स करून तिला या व्यवसायासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. अर्जुन कपूरने ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केल्यावर मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. ती इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करत असते. “ज्यांना मी आवडत नाहीत त्यांच्यासाठीमाझ्याकडे वेळ नाही. कारण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबरोबर मी खूप व्यग्र आहे,” अशा आशयाची पोस्ट तिने नुकतीच केली होती.