टी-सीरिजचे मालक भूषण कुमार आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. कधी बोल्ड फोटो शेअर करत असते तर कधी आगामी चित्रपटांची माहिती देत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. चित्रीकरणादरम्यान तिच्याबरोबर अपघात घडला असून तिला दुखापत झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
दिव्या कुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला जखम झालेली दिसून येत आहे. चेहऱ्यावर झालेल्या जखमेमुळे तिचा चेहरा लाल झालेला दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहले आहे, माझ्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणादरम्यान मला दुखापत झाली आहे. पण काम सुरु ठेवलेच पाहिजे. तुमचे आशीर्वाद आणि एनर्जींची गरज आहे. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिव्याने हा फोटो शेअर करताच नेटकाऱ्यानी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एकाने लिहले आहे “तू याला दुखापत म्हणतेस का?” तर दुसऱ्याने लिहले आहे, “देव तुझ्या गालांचे रक्षण करो”, तर तिसऱ्याने लिहले आहे “याच्यापेक्षा आम्ही शाळेत जास्त जखमी व्हायचो.” आणखीन एकाने लिहले आहे “तुझ्या अशा परिस्थितीत देव तुझ्या घरच्या लोकांचे रक्षण करो.” तर काहींनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार यारियां २ च्या चित्रीकरणादरम्यान ऍक्शन सीन करताना तिला दुखापत झाली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. राधिका राव आणि विनय सप्रू या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्याचं बोललं जात आहे.