Bollywood News : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष अजूनही सुरुच आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पण नंतर शस्त्रविराम झाला. तरीही दोन्ही देशांमधला संघर्ष सुरु आहे. अशात भारतात प्रदर्शित होणाऱ्या ‘परम सुंदरी’ चित्रपटातलं ‘डेंजर’ हे गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याची टीका होते आहे. पाकिस्तानी गाणी भारतात आणि भारतातली गाणी पाकिस्तानात अनेक जण ऐकतात. अनेकदा बॉलिवूड गाण्यांवरुन पाकिस्तानी गाणी कॉपी केली जातात. पण सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या परम सुंदरी चित्रपटातल्या ‘डेंजर’ गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होते आहे.
परम सुंदरीतलं गाणं २१ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यावर काय झालं?
परम सुंदरी चित्रपटातील ‘डेंजर’ हे गाणं २१ ऑगस्टला प्रदर्शित झालं. हे गाणं काही तासांमध्ये चर्चेत आलं आणि प्रसिद्धही झालं. पण आता या गाण्यावर चाल चोरल्याचा आरोप होतो आहे. या संदर्भातला एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
पाकिस्तनच्या गाण्याची कॉपी?
सोशल मीडियावर लोक ही चर्चा करत आहेत की ‘डेंजर’ हे गाणं पाकिस्तानी गाणं लाल सूट या गाण्यावरुन घेतलं आहे. पाकिस्तानमध्ये हे गाणं २०२३ मध्ये रिलिज झालं होतं. पाकिस्तानी ड्रामा मन्नत मुराद मध्ये आहे. या गाण्याची चाल चोरल्याचा आरोप ‘परम सुंदरी’ चित्रपटातल्या डेंजर या गाण्यावर होतो आहे. त्यानंतर परम सुंदरीच्या टीमला ट्रोल केलं जातं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
परम सुंदरी चित्रपटातलं हे गाणं सचिन जिगर यांनी केलं संगीतबद्ध
परम सुंदरी चित्रपटातलं हे गाणं सचिन आणि जिगर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसंच विशाल ददलानी, पार्वती मीनाक्षी आणि सचिन जिगर यांनी आपला आवाज या गाण्याला दिला आहे. हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे.
परदेसिया गाण्याचा वाद काय?
परम सुंदरी गाण्यातील परदेसिया गाण्यावरुनही वाद झाला होता. हे गाणं बॉम्बे चित्रपटातील एक गाणं आणि रोजा चित्रपटातील गाण्याशी मिळतंजुळतं आहे अशी टीका युजर्सनी केली होती. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला बॉम्बे हा चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉम्बे आणि रोजा या दोन्ही चित्रपटांना ए. आर. रहमान यांचं संगीत दिलं आहे. २९ ऑगस्टला म्हणजेच येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उत्तर भारतीय नायक आणि दाक्षिणात्य नायिका या चित्रपटात आहेत असं दाखवण्यात आलं आहे.