scorecardresearch

सलमान- शाहरुखनंतर आता ‘या’ अभिनेत्रींची जोडी दिसणार गुप्तहेरांच्या भूमिकेत; निर्मात्यांनी दिले संकेत

‘पठाण’ चित्रपटात शाहरुख सलमानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती

yrf
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा व्यवसाय करून सुपरहिट ठरला. या चित्रपटात दीपिका पदुकोणचा बोल्ड अंदाज दिसलाच मात्र तिची भूमिकादेखील विशेष होती. या चित्रपटात तिने गुप्तहेराची भूमिका केली होती. तिच्याच बरोबरीने अभिनेत्री कतरीना कैफनेदेखील ‘एक था टायगर’ चित्रपटात गुप्तहेराची भूमिका केली होती. आता निर्माते या दोघींना घेऊन चित्रपट काढण्याच्या तयारीत आहे.

‘पठाण’ व ‘टायगर’ या दोन्ही गुप्तहेरांवरील आधारित चित्रपटांची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे. आता निर्माते या दोन्ही अभिनेत्रींना घेऊन एक वेगळा पण हगुप्तहेरांवर आधारित चित्रपट तयार करण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत ‘पठाण’ व ‘वॉर’ चित्रपटाचे पटकथा लेखक श्रीधर राघवन यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हणाले, “सध्या अशा प्रकारच्या कथांची सध्या कमतरता आहे. आम्ही ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. हे नक्की आहे की आम्ही अभिनेत्रींना घेऊन गुप्तहेरावर बेतलेला चित्रपट तयार करू.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

“तुमच्यात हिंमत लागते…” अक्षय कुमारच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

‘पठाण’ चित्रपटातील दीपिकाने पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारली होती तर कतरीनाने ‘टायग’र चित्रपटात अशीच भूमिका साकारली होती. या दोघींच्या भूमिका एकाच चित्रपटात दाखवण्याची कल्पना निर्मात्यांची आहे. याआधी ‘पठाण’ चित्रपटात सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

‘पठाण’नंतर आता ‘टायगर ३’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. ‘टायगर ३’ मध्ये शाहरुख खानदेखील दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण आता ‘फायटर’ चित्रपटात हृतिक रोशनबरोबर झळकणार आहे तर कतरीना कैफ ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 18:47 IST
ताज्या बातम्या