बॉलिवूडमधील आघाडीचे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव आणि स्टारकास्टही समोर आली. बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीचे लोकप्रिय तीन कलाकार या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. भन्साळींच्या या आगामी चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिका साकारतील. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अँड वॉर’ असे आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमला म्हणजेच २०२५ मध्ये डिसेंबरच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे.

आता या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर नायक किंवा खलनायक म्हणून नव्हे तर एका वेगळाच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार भन्साळी यांच्या या चित्रपटात रणबीर हा ग्रे शेडच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी या तिघांना या चित्रपटात घेण्याआधी यावर भरपुर मेहनत घेतली आहे आणि त्यानंतरच त्यांना या भूमिकेसाठी नक्की करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : मुलाच्या मृतदेहासाठी जगजित सिंग यांना द्यावी लागलेली लाच; महेश भट्ट यांनी सांगितली आठवण

‘पिंकव्हीला’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक लव्ह ट्रायअॅंगल असणार आहे. ‘अॅनिमल’मधील रणबीरचं काम पाहून भन्साळी चकित झाले आहेत अन् आता आपल्या चित्रपटात एक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत पाहण्यासाठी भन्साळी फारच उत्सुक आहेत. भन्साळी यांच्या चित्रपटातील ही सर्वात कठीण भूमिका असल्याचाही खुलासा झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shaheen Bhatt (@shaheenb)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीरची भूमिका वेगळी असणार आहे आणि त्याला भरपुर पैलू असणार आहेत हेदेखील स्पष्ट झालं आहे. ‘अॅनिमल’नंतर रणबीर लगेचच आता ‘रामायण’वर काम सुरू करणार आहे. त्यानंतर तो भन्साळी यांच्या या चित्रपटासाठी वेळ देणार आहे अन् त्यानंतर तो ‘अॅनिमल पार्क’साठी तयारी सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या चित्रपटावर जोमात काम सुरू आहे. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.