अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारत आहे. २००८ साली विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारही देण्यात आला. यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण तिचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. अखेर १५ वर्षांनी अदा ‘द केरला स्टोरी’मुळे रातोरात स्टार झाली.

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सामान्य प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे तर काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोधही करत आहेत. केरळमधील ३ हिंदू मुली ज्यांचं धर्मपरिवर्तन करून त्यांना आयसीसमध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्याविषयी हा चित्रपट भाष्य करतो. याबरोबरच इस्लामी कट्टरपंथी लोक, धर्मांतरण, जिहाद अशा वेगवेगळ्या विषयावर चित्रपट भाष्य करतो. यात अदाने शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका केली आहे.

Konkona Sen Sharma Amol Parashar Dating rumors
घटस्फोटानंतर सात वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करतेय बॉलीवूड अभिनेत्री, पहिल्या पतीने पोस्ट शेअर करत लिहिलं…
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
mai tumhe barbad kar dungi meme actress
लोकप्रिय गाणी व ‘राज’ सिनेमात इंटिमेट सीनमुळे राहिली चर्चेत; ‘या’ व्हायरल मीममधील अभिनेत्री अचानक गायब झाली अन्…
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न

आणखी वाचा : अशनीर ग्रोव्हर अन् त्याचे कुटुंबीय पुन्हा अडचणीत; ८१ कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

मध्यंतरी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अदाने पावनी मेहरोत्रा या यूट्यूबरला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये अदा शर्माला तिच्या या साध्या सोप्या नावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, की तिला हे नाव नेमकं कसं पडलं. तर यावर उत्तर देताना अदाने तिच्या खऱ्या नावाबद्दलही खुलासा केला. या मुलाखतीमध्ये अदा म्हणाली, “माझं खरं नाव चामुंडेश्वरी अय्यर हे आहे, पण नंतर हे नाव उच्चारण्यासाठीही प्रचंड कठीण असल्याने अदा हे नाव घेणं पसंत केलं.”

अदाने तेलुगू चित्रपटसृष्टीतही प्रचंड काम केलं आहे. आदाचा पहिला तेलगू चित्रपट ‘हार्ट अटॅक’ २०१४ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर अदा शर्माने ‘सन ऑफ सत्यमूर्ती’, ‘राणा विक्रम’, ‘सुब्रमण्यम फॉर सेल’ इत्यादी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. ‘द केरला स्टोरी’मुळे तब्बल १५ वर्षांच्या संघर्षानंतर अदा शर्माच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक सुरु आहे.