scorecardresearch

ऐश्वर्या रायला प्लास्टिक म्हणणाऱ्या इमरान हाश्मीचं अभिनेत्रीबद्दल ट्वीट; अक्षय कुमारला टॅग करत म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे.

ऐश्वर्या रायला प्लास्टिक म्हणणाऱ्या इमरान हाश्मीचं अभिनेत्रीबद्दल ट्वीट; अक्षय कुमारला टॅग करत म्हणाला…
(फोटो – ट्विटर)

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी ‘सेल्फी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. राज मेहता दिग्दर्शित या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात तो अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. तर ट्रेलर २२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अशातच, इमरान हाश्मीने एक ट्वीट केलंय. त्याचं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

Video: “मला…” राखी सावंतचं पोलिसांत तक्रार देणाऱ्या शर्लिन चोप्राला एका वाक्यात उत्तर

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो अक्षय कुमारबरोबर सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहे आणि फोटोच्या बॅकग्राउंटमध्ये ऐश्वर्या रायचे पोस्टर आहे. इमरान हाश्मीच्या या ट्वीटमध्ये तो व अक्षय ऐश्वर्या रायच्या फोटोबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने “तिच्याबरोबर (ऐश्वर्याबरोबर) नाही तर तिच्या फोटोबरोबर सेल्फी घेऊ, हो ना अक्षयकुमार” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, एकदा इमरान हाश्मीने ऐश्वर्या रायला प्लास्टिक म्हटलं होतं. करण जोहरच्या शोमध्ये पोहोचलेल्या इमरानने तिला प्लास्टिक म्हटल्यावर बराच वाद झाला होता. या वक्तव्यावर नंतर अभिनेत्याने ऐश्वर्या रायची माफीही मागितली होती. याबरोबरच त्याने स्वत:ला अभिनेत्रीचा मोठा चाहता असल्याचंही म्हटलं होतं.

इमरान-अक्षयचा ‘सेल्फी’ चित्रपट पुढील महिन्यात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 09:04 IST

संबंधित बातम्या