Fighter box office collection Day 1: हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ चित्रपट गुरुवारी २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटाची मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.

‘फायटर’ला पहिल्या दिवशी ‘पठाण’ इतकी कमाई करता आलेली नाही. ‘सॅकनिल्क’ च्या रिपोर्टनुसार, फायटरने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये २२ कोटी रुपये कमावले आहेत. सुट्टीचा दिवस नसूनही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आज शुक्रवारी २६ जानेवारीनिमित्त सुट्टी आहे आणि पुढचे दोन दिवस वीकेंड आहे. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने चित्रपटाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि कमाईत आणखी वाढ होऊ शकते.

pune cp amitesh kumar marathi news
पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights Match in Marathi
LSG vs CSK Highlights, IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय, राहुल-डी कॉकने झळकावले अर्धशतक
brother in law of Mugdha Vaishampayan wish her birthday and share funny photo
मुग्धा वैशंपायनच्या ‘जिजाजी’ने मजेशीर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, गायिका म्हणाली, “अरे काय…”
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

“जीवाची घालमेल होईल…”, मराठी अभिनेत्रीने शेअर केला मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ फोटो, आरक्षणाबद्दल म्हणाली…

‘फायटर’ची पहिल्या दिवसाची कमाई हृतिक रोशनच्या ‘वॉर’ आणि ‘बँग बँग’ या मागील ॲक्शन चित्रपटांपेक्षा कमी आहे. ‘वॉर’ने पहिल्या दिवशी ५३ कोटींची ओपनिंग केली होती. तर ‘बँग बँग’ने पहिल्याच दिवशी २७ कोटींची कमाई केली होती. ‘फायटर’बद्दल बोलायचं झाल्यास आखाती देशांनी त्यांच्या देशात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिलेली नाही. पण हा चित्रपट यूएईमध्ये प्रदर्शित होईल, असं म्हटलं जातंय.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

‘फायटर’ हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. २०१९ मध्ये काश्मीरमध्ये झालेला पुलवामा हल्ला व त्यानंतर भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेला एअर स्ट्राइक याचे संदर्भ चित्रपटात आहेत. या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.