Filmfare Awards 2023 : ६८व्या फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या दोन चित्रपटांचा जलवा पाहायला मिळाला.

राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या फिल्मफेअर पुरस्काराची मानकरी ठरली. गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह १० पुरस्कार मिळाले. तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-१ शिवा’ या चित्रपटालाही चार कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. परंतु, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला यंदाच्या फिल्मफेअरमध्ये एकही पुरस्कार देण्यात आला नाही.

हेही वाचा>> ‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आकाश ठोसर पोस्ट शेअर करत म्हणाला…

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. “इज्जत ही महागडी गोष्ट आहे. त्यामुळे ती देण्याची अपेक्षा छोट्या लोकांकडून ठेवू नये,” असं अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनुमप खेर यांच्या या पोस्टचा संबंध फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याशी जोडला जात आहे.

हेही वाचा>> पाणावलेले डोळे, भांगेत कुंकू अन्…; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार २०२३मध्ये सात श्रेणींत नामांकन मिळालं होतं. काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हते. एक दिवस आधीच त्यांनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचं सांगितलं होतं. अग्निहोत्रींनी फिल्मफेअर पुरस्कारांना नैतिकदृष्ट्या स्वीकारण्यास योग्य नसल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं होतं.