रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्याकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांची पहिली भेट २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. जवळपास ८ ते ९ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. जिनिलीयाने देशमुखांची सून झाल्यावर सगळे संसार, मराठी परंपरा आत्मसात केल्या. अभिनेत्री मूळची महाराष्ट्रातील नसूनही आता ती उत्तम मराठी भाषा बोलते. देशमुखांबरोबर जिनिलीया प्रत्येक मराठी सण उत्साहाने साजरे करते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

रितेश-जिनिलीया महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. या दोघांच्या लग्नाला आता १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. आधीपासूनच जिनिलीया रितेशच्या कुटुंबीयांबरोबर प्रत्येक मराठी सण उत्साहात साजरे करते. नुकतीच तिने सासरी मकरसंक्रात साजरी केली.

Prime Minister Modi changes his profile picture on social media
Photo: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नव्या लूकमध्ये; सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये केला ‘हा’ मोठा बदल
Mallikarjun Kharge Said This Thing about Narendra Modi
“दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन..”, मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Smriti Irani Funny Memes
स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल; युजर्सच्या ‘अशा’ प्रतिक्रिया वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
vidya Niketan school Dombivli marathi news
अन्यथा डोंबिवलीकरांवर भ्याड नागरिकांचे शहर म्हणून शिक्का, विद्यानिकेतन शाळेच्या जनजागृती फलकातील संदेश
What was the Lahore Agreement of 1999
१९९९ चा लाहोर करार काय होता? ज्यावर नवाज शरीफ यांनी २५ वर्षांनंतर मान्य केली चूक, अटलजींचीही काढली आठवण
sonali tanpure post
“पोर्श कार अपघातानंतर ‘त्या’ गोष्टी पुन्हा आठवल्या”; आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!
Sambit Patra
“भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त”, पश्चात्तापदग्ध संबित पात्रांचे ३ दिवसांचे उपोषण
DCM Devendra Fadnavis Big statement
“…तर निवृत्ती घेतली असती”; फडणवीसांचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, “जर वेळ आली”

हेही वाचा : एकाच दाक्षिणात्य चित्रपटात झळकल्या दोन मराठमोळ्या अभिनेत्री! साकारली मायलेकींची भूमिका, कोण आहेत ‘त्या’ दोघी?

मराठी परंपरेनुसार संक्रांतीचं पूजन करून जिनिलीयाने मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. याची खास झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेत्रीने खास तिच्या चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने यापूर्वी दिवाळी, वटपौर्णिमा हे सण देखील तेवढ्याच आनंदात साजरे केले होते.

हेही वाचा : Fighter Trailer : देशभक्ती, पुलवामा हल्ला अन्…; हृतिक व दीपिकाच्या बहुचर्चित ‘फायटर’चा ट्रेलर प्रदर्शित

genelia
जिनिलीया देशमुख

दरम्यान, रितेश-जिनिलीया ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. रितेशने अलीकडेच त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे, जिनिलीया शेवटची ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटात झळकली होती.