Genelia Deshmukh features in Riteish Deshmukh Starer Masti 4 : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. या दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अशातच आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटातून एकत्र झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जिनिलीया नुकतीच ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून झळकली होती. त्यामधून तिनं पहिल्यांदाच आमिर खानसह काम केलं आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. तर रितेशसुद्धा नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून झळकला होता. ‘हाऊसफुल ५’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

रितेश देशमुख सध्या त्याच्या ‘मस्ती ४’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अशातच आता रितेश व जिनिलीया यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे ‘मस्ती ४’ या चित्रपटातून जिनिलीया देशमुखही झळकणार असल्याची शक्या वर्तवली जात आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार मिलाप झवेरी दिग्दर्शन करीत असलेल्या ‘मस्ती ४’ चित्रपटातून ही जोडी एकत्र पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘मस्ती ४’ या चित्रपटात आफताब शिवदासानी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या परदेशात सुरू आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार परदेशात ‘मस्ती ४’चं चित्रीकरण पाहण्यासाठी जमलेल्यांपैकी एकानं या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यातील एका फोटोमध्ये जिनिलीया देशमुखही पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मस्ती ४’च्या सेटवर चित्रपटातील एका अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी तिथे जिनिलीया उपस्थित असल्यानं ती फक्त रितेशच्या चित्रपटाचं चित्रीकरण पाहण्यासाठी गेली असावी, असं म्हटलं जात होतं. परंतु, काही फोटोंमध्ये मात्र अभिनेत्री काही स्टेप्सची रिहर्सल करतानासुद्धा दिसत आहे. त्यामुळे आता जिनिलीया व रितेश हे दोघेही या चित्रपटातून झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावेळी जिनिलीया-रितेश यांच्यासह त्यांची मुलंदेखील उपस्थित असल्याचं दिसत आहे.