Genelia & Riteish Deshmukh : मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून जिनिलीया व रितेश देशमुखला ओळखलं जातं. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक अपडेट्स रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर शेअर करत असतात. या दोघांचे मजेशीर व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. रितेश-जिनिलीयाने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहुयात…

रितेश आणि जिनिलीया गेल्या काही महिन्यांपासून शूटिंग, चित्रपटांचं प्रमोशन या सगळ्यात व्यग्र आहेत. मात्र, आता वेळात वेळ काढून हे दोघंही आपल्या चाहत्यांचं रिल्स व्हिडीओजमधून पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जिनिलीया या व्हिडीओमध्ये रितेशला तिच्यासाठी गाणं गाण्याची विनंती करते, अगदी हट्टाला पेटते. यानंतर अभिनेता कोणतं गाणं गाणार आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे बदलतात पाहुयात…

जिनिलीया या व्हिडीओमध्ये रितेशला सांगते, “ऐका ना… मी तुम्हाला अजूनही आवडते का?” यावर अभिनेता ‘हो’ असं उत्तर देतो. यानंतर जिनिलीया त्याला सांगते, “मग माझ्यासाठी एक गाणं गा…तुम्हाला माझी शपथ आहे.” खरंतर गाणं गायला सांगितल्यावर रितेशच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदलतात पण, आता बायकोपुढे काय चालणार असे एक्स्प्रेशन्स देऊन रितेश ‘ओके’ म्हणतो आणि गाणं गायला सुरुवात करतो.

रितेश जिनिलीयासाठी “तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है…क्या चीज़ हो तुम खुद तुम्हे मालूम नही है” हे जुनं गाणं म्हणतो. पण, या गाण्यावर हावभाव करताना रितेश एकदम हटके आणि बायकोला कंटाळून हे गाणं गातोय असे एक्स्प्रेशन्स देतो. इतक्यात जिनिलीया त्याच्याकडे पाहते, तोवर रितेश लगेच सगळे हावभाव लपवून तिच्याकडे हसत-हसत पाहतो. दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जिनिलीया या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “माझा नवरा माझ्यासाठी गाणं गातोय यापेक्षा भारी अजून काय असू शकतं.” या पोस्टमध्ये अभिनेत्रीने त्याला टॅग सुद्धा केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “भाऊ-वहिनी बेस्ट”, “रितेश जबरदस्त”, “बॉलीवूडची सगळ्यात आवडती जोडी”, “रितेश भाऊंचे एक्स्प्रेशन्स पाहण्यासारखे होते” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.